भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ; संपूर्ण देश शोकसागरात

 

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ; संपूर्ण देश शोकसागरात 

 मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरस्वरी भारतरत्न लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांचे आज रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील ( Breach Candy Hospital ) आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.रविवारी सकाळी  लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली.

स्वरसम्राज्ञी लता दीदीना भावपूर्ण श्रद्धांजलि - राज्य रिपोर्टर न्युज

 

Post a Comment

0 Comments