वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण :अवैध बांधकाम करून राहणाऱ्याना हटविले

 



वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण :अवैध बांधकाम करून राहणाऱ्याना हटविले

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह वनपरिक्षेत्र अंतर्गत नियतक्षेत्र केम मधील  ५७४ कक्ष मध्ये बल्लारपूर व बामणी येथील अंदाजे ५० नागरिकांनी २ हेक्टर वनजमीनीवर अतिक्रमण केल्याची माहिती वनविभागाला मिळताच श्री.संतोष थिपे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह व त्यांच्या चमू ने घटनास्थळावर तातडीने उपस्थित राहून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण केली.

 या संदर्भातील अधिक माहितीनुसार कक्ष क्रमांक ५७४ मध्ये बल्लारपूर व बामणी परिसरातील नागरिकांनी अवैधरित्या चुन्याने आखणी करून जागा आपसात वाटप करून घेतले होते. मात्र या प्रकरणाची माहिती वनविभागा ला मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होऊन अतिक्रमण धारकांना संरक्षित वनजमीनीवर अतिक्रमण करणे भारतीय वनअधिनियम १९२७ नुसार कायद्याने वनगुन्हा ठरतो याबाबत नागरिकांना माहिती दिली व त्यांचे समुपदेशन केले.

 यामुळे तेथील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून जागेचा ताबा सोडण्याचा कबूल केले व सदर जागेवरील खुंट्या, बांबू, ग्रीननेट व कापड स्वतःहून काढून घेतले याबाबत ची सदर कारवाई पर्ण केली.श्री.नरेश भोवरे,वनक्षेत्र सहायक बल्लारशाह,श्री.भगीरथ पुरी, वनक्षेत्र सहायक कळमना,श्री.संजय जुमळे वनसंरक्षक केम,श्री.राकेश शिवणकर, वनसंरक्षक किन्ही,श्री.सिध्दार्थ कांबळे वनरक्षक बल्लारशाह, मनोज घाईत वनरक्षक लावारी-१,कु.आरती आईटलावर, लावारी-२ व कु.लोपा प्रतापगिरीवार वनरक्षक कळमना यांनी श्री.संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांच्या नेतृत्वात श्री.अरविंद मुंडे, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर,श्री.श्रीकांत पवार, सहायक वनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण केली.

   

Post a Comment

0 Comments