हिरे स्वस्त, गरिब उध्वस्त तरी सरकार म्हणते अर्थसंकल्प मस्त - आ. किशोर जोरगेवार

 



हिरे स्वस्त, गरिब उध्वस्त तरी सरकार म्हणते अर्थसंकल्प मस्त - आ. किशोर जोरगेवार


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडे महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचे लक्ष होते. हा अर्थसंकल्प महागाई दुर करेल अशी आशा होती. मात्र सदर अर्थसंकल्पात महागाई नियंत्रणात आणण्याच्या दिशेने कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. एकीकडे महागाईमुळे गरिब उध्वस्त होत असतांना हिरे मात्र स्वस्त करण्यात आले आहे. असे असतांनाही सकरकार अर्थसंकल्पाबाबत गवगवा करत आहे. त्यामूळे एकंदरीत अर्थसंकल्पाचा विचार केला असता हिरे स्वस्त, गरिब उध्वस्त तरी सरकार म्हणते अर्थसंकल्प मस्त अशीच अवस्था दिसून येत असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

कोरोनाच्या महामारी नंतर अनेकांनी रोजगार गमविला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, घरगुती गॅसच्या किंमतीत प्रंचड वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट डगमगले आहे. अशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांसाठी, महागाई नियंत्रणासाठी तसेच रोजगार उपलब्धीसाठी मोठ्या घोषाणा होण्याची अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पात विशिष्ट एका वर्गाकडे लक्ष केंद्रीत करुन घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामूळे या अर्थसंकल्पात सर्वसमान्यांची मोठी निराशा झाली आहे. 60 लक्ष रोजगार निमिर्तीची घोषणा करण्यात आली असली तरी हा रोजगार कसा उपलब्ध होणार याबाबत ठोस अशी माहिती देण्यात आलेली नाही. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होतील अशी अपेक्षा होती मात्र या अर्थसंकल्पात त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अमृत महोत्सवी वर्षात सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प देशाला महागाई मुक्त, रोजगार युक्त आणि प्रगतीपथावर नेणारा ठरणार अशी आशा होती. मात्र एंकदरित पाहता हा अर्थसंकल्प महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांची अपेक्षा भंग करणारा, बेरोजगार युवकांची निराशा करणारा आणि केवळ आकड्यांचा फुगवटा दाखवत जनतेला भ्रमित करणारा ठरला आहे.



Post a Comment

0 Comments