गरिबांच्या झोपडपट्यांना स्थायी पट्टे देण्यासाठी दिरंगाई का - आ. किशोर जोरगेवार

 



गरिबांच्या झोपडपट्यांना स्थायी पट्टे देण्यासाठी दिरंगाई का - आ. किशोर जोरगेवार

◾आ. जोरगेवार यांनी घेतली जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची आढावा बैठक, 39 झोपडपट्टयांची एकत्रित सर्वेक्षण करण्याची सूचना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : नागरिकांना जागेचे स्थायी पट्टे देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून रेंगाळत ठेवण्यात आला आहे. इतर सर्व कामांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केल्या जाते तर गरिबांच्या झोपडपट्यांना जागेचा पट्टा देण्यात इतकी दिरंगाई  का असा प्रश्न उपस्थित करत शहरातील 39 झोपडपट्टयाचे सर्वेक्षण करुन आराखडा तयार करत एकत्रित मंजूरी देत कमीतकमी दरात त्यांना पट्टा देण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मनपा आयुक्त विपिन पलीवाल यांना केल्या आहे. 

   चंद्रपूरात नजूलच्या जागेवर बसलेल्या नागरिकांना स्थायी स्वरुपाचा जागेचा पट्टा देण्यात यावा या करिता आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केली होती. त्यांनतर याबाबत बैठक घेण्याचे निर्देश महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. दरम्याण आज जिल्हाधिकारी कार्यालयात सदर बैठक पार पडली या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, नगर रचना विभागाचे दहिकर, तहसीलदार निलेश गोंड, जमीन शाखेचे सहायक अधिक्षक सचिन पाटील आदिंची उपस्थिती होती.

  चंद्रपूर शहरातील अधिकांश भाग हा नजूलच्या जागेवर बसला आहे. मागील अनेक वर्षापासून सदर नागरिक येथे वास्तव्यास आहे. असे असले तरी त्यांना जागेचा स्थायी स्वरुपी पट्टा देण्यात आलेला नसल्यामूळे अनेक शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता सदर नागरिकांना जागेचा स्थायी स्वरुपी पट्टा देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केली होती. याचा पाठपूरावाही त्यांच्या वतीने सातत्याने सुरु आहे. दरम्याण आज या बाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांसह मनपा आयुक्त यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीत केवळ 14 झोपडपट्यांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्षेप घेत शहरातील 39 झोपडपट्यांचे एकत्रित सर्वेक्षण करण्याच्या सुचना केल्यात.

  यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील 39 झोपडपट्यांमध्ये राहणा-या 11 हजार 881 झोपडपट्टीधारकांचा हा प्रश्न असून जागेचा पट्टा नसल्याने जवळपास हजारो लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत असल्याचे सांगीतले. पट्टे वाटपामध्ये सुरु असलेल्या दिरंगाईमूळे शहरातील एक मोठा वर्ग प्रभावित होत असतांनाही सदर प्रश्न रेंगाळत ठेवल्या जात असल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला.

 जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे देखील सकारात्मक असून पट्टे देण्याच्या मागणीसाठी ते आग्रही आहे. नागपूरला पट्टे वाटप करण्यात आलेल्या पध्दतीचे अवलोकन करुन सदर प्रक्रिया सुलभ व जलत गतीने पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी केल्यात. प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रत्येक महिण्याला याबाबतची आढावा बैठक घेण्याचेही यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीतले, तसेच पंतप्रधान आवाज योजनेस पात्र अससेल्या घरांना मोफत पट्टे देण्यात यावे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अतिक्रमन धारकांकडून कब्जेहक्काच्या रकमेची आकारणी करण्यात येऊ नये, उर्वरित प्रवर्गाच्या बाबतीत पहिल्या 500 चौ. फुट क्षेत्रापर्यंत कब्जेहक्काच्या रकमेची आकारणी करण्यात येऊ नये, 500 चौ. फुट अधिक परंतू 1000 चौ. फुट पर्यंत जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर मुल्य तक्त्यातील दरानूसार येणा-या किमतीच्या 10 टक्के आणि 1000 चौ. फुट पेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी 25 टक्के कब्जेहक्काची रक्कम आकारण्यात यावी अशा सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. सदर बैठकीला संबंधित विभागाच्या अधिका-र्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments