सौंदडच्या राज्यस्तरीय कवी संमेलनात 'माय मराठीचा' गजर

 



सौंदडच्या राज्यस्तरीय कवी संमेलनात 'माय मराठीचा' गजर

◾१०० कवींच्या उपस्थितीत रंगला 'माय मराठी' पुरस्कार सोहळा


नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने यंदाचा कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर जयंती व जागतिक मराठी भाषा गौरव दिन सोहळा पँराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड, ता. सडक अर्जुनी, जिल्हा येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कवी संमेलनात 'माय मराठी' प्रानिधिक कविता संग्रह तसेच वर्षा भांडारकर लिखित 'वर्षाव प्रेमाचा' व  छाया बोरकर लिखित 'पळसफुले' काव्यसंग्रहाचा प्रकाशन व १०० कवींच्या पुरस्काराने संपन्न झाला.

राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन व पुरस्कार  समारंभास अध्यक्ष संदीप मोदी युवा उद्योजक, प्रमुख मार्दर्शक म्हणून प्रभाकर दहिकर, प्रा मुन्ना नंदागवळी, अभिनेत्री निर्माती प्राजक्ता खांडेकर, प्रमुख अतिथी मा .जि. प .सदस्य सौंदड, मा .रमेश चुर्हे ,अध्यक्ष राईसमिल सह .स .सौंदड, मा .संतोष राऊत ,पराडाईज इंग्लिश स्कुल सौंदड, मा .दुर्गेश न्हामुर्ते ,टि व्ही एस ट्रेडर्स सौंदड, मा .हर्ष विनोदकुमार मोदी,सामाजिक कार्यकर्ता सौंदड, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा .गायत्रीताई इरले ,सरपंच सौंदड, मा. सत्यजित राऊत, कार्यकारी अभियंता सौंदड, मा. डॉ.पांडुरंग मारगाये, सेवानिवृत्त पशुवैदकीय अधिकारी सौंदड, मयुर निमजे, नागपूर, राजू नवनागे, डॉ आशीष उजवणे व संदीप नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक केवलचंद शहारे व किशोर बनसोड यांनी संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त अरविंद उरकुडे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या वतीने मान्यवरांचा सन्मानचिन्ह, साहित्यसंपदा, सन्मानपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राहुल पाटील व सविता पाटील ठाकरे यांनी संपादित केलेल्या 'माय मराठी' या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे लोकार्पण करण्यात आहे. या संग्रहात राज्यातील ९० कवींच्या दर्जेदार रचनांना स्थान देण्यात आले आहे. तद्वतच कवयित्री वर्षा भांडारकर यांच्या 'वर्षाव प्रेमाचा' व छाया बोरकर यांच्या 'पळसफुले' कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. 'माय मराठी' कवितासंग्रहात सहभागी कवी कवयित्रींचा संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र संग्रहाच्या दोन प्रती व पुष्प देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर मंचावरील मान्यवरांनी आपल्या भाषणातून उपस्थित साहित्यिकांना मार्गदर्शन केले.

दुपार सत्रात राज्यस्तरीय निमंत्रितांच्या कवी संमेलनास सुरूवात करण्यात आली. संस्थेतर्फे कवयित्री पुष्पगंधकार पुष्पा डोनीवार, चंद्रपूर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. डोनीवार यांच्या अध्यक्षतेखाली ५० निमंत्रित कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून संमेलनात रंगत आणली. सादरीकरणानंतर सर्व कविंचा माय मराठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या बहारदार कार्यक्रमाचे सुत्र संचालन मुख्य परीक्षक कवयित्री वैशाली अंड्रस्कर यांनी केले तर आभार प्रा. तारका रूखमोडे यांनी मानले. कवी संमेलनात निवडक व दर्जेदार कवितांचे सादरीकरण 

दत्ता विष्णू खुळे, जालना, तारका रुखमोडे ,अर्जुनी /मोर, रूपाली मस्के, गडचइरोली संदीप मेश्राम, गोंदिया, सुधाताई मेश्राम ,अर्जुनी /मोर, हंसराज खोब्रागडे,अर्जुनी /मोर, केवलचंद शहारे ,सौंदड, किशोरकुमार बन्सोड ,गोंदिया, वैशाली अंड्रस्कर चंद्रपूर, संदीप मोरांडे , नागपूर, पंकज चारथळ, नागपूर, प्राजक्ता खांडेकर नागपूर, वर्षा भांडारकर मूल, अरविंद उरकुडे, मंदाकीनी चरडे, चंद्रपूर, अश्लेष माडे, कोहमारा, प्रा .छाया बोरकर अर्जुनी /मोर, मूलचंद मंडाले,कुंभिटोला/ बा., चंदू डोंगरवार ,अर्जुनी /मोर, कविता कठाने ,भंडारा, विजेता चनेकर ,अंजोरा,  बिसने गुरुजी ,साकोली, प्रतिभा रामटेके ,अर्जुनी /मोर या निमंत्रित कवींनी केले.



Post a Comment

0 Comments