बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन श्रमदान करून रस्त्याची पडलेली मोठे खड्डे बुजवून एक आदर्श प्रस्थापित केला

 



बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन श्रमदान करून रस्त्याची पडलेली मोठे खड्डे बुजवून एक आदर्श प्रस्थापित केला 

◾रस्ता च्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने अपघाताची संभाव्यता अधिक बळावली 

गडचिरोली  ( राज्य रिपोर्टर ) : चामोर्शी - भेन्डाळा मुख्य रस्ता वरील फोकुर्डि समोरील रस्ता च्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने अपघाताची संभाव्यता अधिक बळावली असता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत  उमेद सावित्रीबाई महिला  प्रभाग संघ  भेन्डाळा - मुरखळाच्या सदस्यानी एकत्र येऊन व श्रमदान करून पडलेली मोठे खड्डे बुजवून एक आदर्श प्रस्थापित केला. या कार्य चे सर्वांनी कौतुक करीत आभार ही मानले. सदर श्रमदान प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक विनोद बोबाटे, तालुका  व्यवस्थापक तुषार करने, प्रभाग समन्वयक एकनाथ सेलोटे, रवींद्र चुनारकर, देवानंद जुवारे तसेच प्रभागसंघ समुदाय संसाधन व्यक्ती यांनी श्रमदान करीत रस्ता डागडूजी पूर्ण करून प्रवास सुख कर करण्यासाठी अथक अशी मेहनत घेतली.


Post a Comment

0 Comments