हिंगणघाट जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे ला मरेपर्यंत जन्मठेप सत्र न्यायालयाचा निकाल !

   



हिंगणघाट जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे ला मरेपर्यंत जन्मठेप सत्र न्यायालयाचा निकाल !

◾प्राध्यापिका ( अंकिता ) आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिला होता !

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : हिंगणघाट तालुक्यातील नंदोरी येथील प्राध्यापिका ( अंकिता ) जळीत प्रकरणी न्यायालयाने आज आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी या प्रकरणी दोषी ठरविले होते. नगराळे हा मागील २ वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत असला तरी शिक्षा भोगतांना हा कालावधी गृहीत धरला जाणार नाही. असेही न्यायालयाने स्पष्ट केले अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.

        ३ फरवरी २०२० ला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नंदुरी गावातील चौकात प्राध्यापिका ( अंकिता ) ही सकाळच्या सुमारास महाविद्यालयात जात असतांना आरोपी विकेश नगराळे चौक परिसरात ती आली असता आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले यात ती तरुणी ४०% भाजली तिच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते सात दिवस पीडितेवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्या पीडितेचा १० फरवरी २०२० ला मृत्यू झाला विशेष म्हणजे आज या दुर्दैवी घटनेच्या स्मृती दिनी १० फरवरी २०२२ लाच हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

      सदर प्रकरण दुर्मीळातीळ दुर्मिळ नसल्यामुळे फाशीची शिक्षा देता येत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट करीत या प्रकरणात आरोपीला ५ हजार रुपयांचा दंड व  मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा सुनावली.

Post a Comment

0 Comments