सलग तिसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात महिला ठार !

 



सलग तिसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात महिला ठार ! 

◾मूल तालुक्यातील कोसं बी येथील शेतात गेलेल्या महिलेवर हल्ला

मूल ( राज्य रिपोर्टर ) : बुधवारला भोजराज मेश्राम ५५ व गुरुवारला राज भडके या १६ वर्षीय निष्पाप मुलाला बिबट्याने हल्ला करून ठार केल्याच्या घटनेची शाई संपत नाही तोच आज १८ फरवरीला मूल पासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा कोसम्बी येथील शेतकरी महिला सौ ज्ञानेश्वरी वासुदेव मोहूर्ले वय (५५ ) वर्ष, ही आपल्या स्वतःच्या शेतात लाखोरी खोदत असतांना वाघाने पाठीमागून महिलेवर हल्ला करून माणेलाच पकडून जवळपास ५० मीटर अंतरावर ओढत नेत जागीच ठार केल्याची घटना आज दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबत ची माहिती कोसम्बी वासीयांना कळताच गावातील सरपंच रविंद्र कामडी, पोलीस पाटील अर्चना मोहूर्ले, सारिका गेडाम, व गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले तसेच याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे मॅडम, क्षेत्र सहायक प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, श्री मरसकोल्हे ई घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आला. तसेच तात्पुरती मदत म्हणून मृतकाच्या कुटुंबियांना वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी तात्काळ ३०,०००/- रु आर्थिक मदत केली तसेच यापुढील तपास प्रियंका वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यासह व पोलीस निरीक्षक सतीशसिह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग करीत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सलग ३ दिवसात वन्यप्राण्यांनी हल्ला करून ३ निष्पाप नागरिकांचा जीव गेला यामुळं वनविभागा विरुध्द रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.



Post a Comment

0 Comments