एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या माध्यमातून कौशल्य विकासासह रोजगाराची संधी - आ. किशोर जोरगेवार

 



एम्ब्रॉयडरी अँड  स्टीचिंग क्लस्टरच्या माध्यमातून  कौशल्य विकासासह रोजगाराची संधी - आ. किशोर जोरगेवार

 

◾एम्ब्रॉयडरी अँड  स्टीचिंग क्लस्टरच्या इमारत बांधकामाचे उद्घाटन


    

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : आजचा युवक हा प्रतिभावंत आहे. नवे कौशल्य आत्मसाद करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. मात्र  व्यासपीठ आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात यश संपादित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो याचा परिणाम रोजगारावरही होतो. मात्र आता एम्ब्रॉयडरी अँड  स्टीचिंग क्लस्टरच्या माध्यमातून युवक - युवतींना कौशल्य विकासासह रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

       सर्च एम्ब्रॉयडरी अँड कांथा स्टीचिंग क्लस्टर फौंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एम्ब्रॉयडरी अँड  स्टीचिंग क्लस्टरच्या इमारत बांधकाम व मशनरी प्रतिष्ठाचा उद्घाटन सोहळा काल शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांची उद्घाटक म्हणूत उपस्थिती होती तर राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकरराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्यजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळेजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणेधणोजी कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुतेअमोल गायकवाडचंद्रकांत वासाडेराजेश पेचेविजय बदकलदिलीप झाडे आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.

     यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कीरोजगार उपलब्धतेसाठी औद्योगिक क्षेत्राची गरज आहे. मात्र औद्योगिकीकरन होत असताना साहजिकच प्रदूषणातही वाढ होणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवत  रोजगार निर्मिती करता येईल अशा उद्योगांकडे वळण्याची गरज आहे. एम्ब्रॉयडरी अँड  स्टीचिंग क्लस्टर हा सुरू झालेला  उद्योग याचेच एक उत्तम उदाहरण असून यातून हजारो युवक युवतींच्या हाताला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अश्या उद्योगांना लोकप्रतिनिधी म्हणून शक्य ती सर्व मदत करण्याची आमची तयारी आहे. फक्त या उद्योगांनी रोजगार देत असतांना स्थानिकांना प्राधान्य दिले पाहीजे. आजचा हा उदघाटन सोहळा खर तर अनेक बेरोगारांसाठी रोजगाराची नवी संधी घेऊन आला असल्याचेही ते यावेळी म्हणाले, एम्ब्रॉयडरी अँड  स्टीचिंग क्लस्टरमध्ये कापडी शिवणकाम केल्या जाणार आहे. त्यामुळे शिवणकामाची आवड असलेल्या युवतींसाठी हि एक चांगली संधी उपलब्ध झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी  आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील कामाची पाहणी करत माहिती घेतली.  या कार्यक्रमाला येथील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments