बनावट दागिने समजून दारूच्या नशेत चोरली चक्क ४७.८२ लाखांनी भरलेली बॅग

 


बनावट दागिने समजून दारूच्या नशेत चोरली चक्क ४७.८२ लाखांनी भरलेली बॅग  

◾चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : रायपूरहून बैतुलला गेलेल्या एका व्यक्तीची सोन्याच्या दागिन्यांची बॅग वर्धा रेल्वे स्थानकावरून चोरीला गेली. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता शनिवारीच्या रात्रीदरम्यान चोरट्याला ताब्यात घेऊन ४७ लाख ८२ हजार ३१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रायपूर येथील रहिवासी अमित रमेशकुमार पारख ( ४२ ) यांचे पारख दिया ज्वेलर्सचे दुकान आहे. ते त्यांच्या दुकानातून विविध ठिकाणी हिऱ्यांचे दागिने पुरवितात. सोन्याचे टॉप्स आणि अंगठ्याचे दागिने बैतूल ( मध्य प्रदेश ) येथे पाठवायचे होते. त्यांच्या दुकानात मार्केटींगचे काम करीत असलेला पुरुषोत्तम सुकलाल यादव याला सर्व सोन्याचे दागिने दिले होते. ९ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता अमित पारख यांनी पुरुषोत्तम यादवला रायपूर रेल्वेस्थानकावर सोडले. त्याच्याकडे १४ आणि १८ कॅरेट सोन्याचे दागिने होते. ज्यात ७१ अंगठ्या आणि ८२ टॉप्स, असा एकूण ४७ लाख ८२ हजार ३१९ माल प्लास्टीक डब्यामध्ये पॅकिंग करून दिला होता. दुपारच्या दरम्यान पुरुषोत्तम यादव याचा पाखर यांना फोन आला की, बैतूलला जाणारी रेल्वे सुटली. नागपूर येथे पोहोचलो बैतुलला जाणा-या रेल्वेमध्ये बसलो आहे, असे त्याने सांगितले. पुरुषोत्तम यादव याच दरम्यान मोबाईल बंद येत होता.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्याने नवीन नंबरवरून पारखला फोन केला. त्याने वर्ध्याला पोहोचल्याचे सांगितले. तो नागपुरात दारू प्यायल्याने त्याने नशेच्या अवस्थेत वर्धा गाठले असल्याचे सांगितले. पारख यांनी तू तिथेचे थांब, असे सांगून अमित पारख हे बैतूलहून वर्ध्याला निघाले. ११ फेब्रुवारीला सकाळी वर्ध्याला पोहोचले. वर्धा रेल्वेस्थानकावर आल्यानंतर पुरुषोत्तम यादव हे दारूच्या नशेत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची शुद्ध नव्हती. रात्रभर रेल्वे स्थानक परिसरात झोपला होता. सकाळी उठल्यानंतर दागिने असलेले बँग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसले. यादव शुद्धीवर आल्यानंतर पाखर यांनी त्याची विचारपूस केली. त्यानंतर शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. अकोला जिल्ह्याच्या दिशेने एक पथक रवाना करण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे शहरातील पोद्दार बगीचा रहिवासी महेश उर्फ सुदाम पांडुरंग गाठेकर ( ३२ ) त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर करून त्याची १५ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, डीवायएसपी पियुष जगताप, एपीआय गणेश बैरागी, पीएसआय प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एसएचओ सत्यवीर बंडीवार यांच्या सूचनेवरून कर्मचारी सचिन इंगोले, संजय पंचभाई, सुभाष घावड, अनुप राऊत, किशोर साठोणे, दीपक जंगले, सुनील मेंढे, राजेश ढगे, श्याम सलामे, आकाश बांगडे, पवन निलेकर, राहुल भोयर आदींनी केली. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश गाठेकर हा देखील मद्यधुंद अवस्थेत होता. तो आणि पुरूषोत्तम यादव हे दोघेही रेल्वेस्थानकाच्या आवारात बराच वेळ पडून होते. यादवसोबत एक बॅग देखील पडली होती. आरोपी दारूच्या नशेत ती बँग घेऊन घरी गेला होता. त्यानंतर बँग ठेवून झोपला. सकाळी उठल्यांतर बँग उघडून पाहिली असता त्या बँगेत दागिने दिसले. त्यानंतर आरोपीचीही धाकधुक वाढली होती. या बनावट दागिन्यांचे काय करायचे, हेही आरोपीला सुचत नव्हते. पोलिसांच्या भीतीने आरोपी ही बॅग घेऊन आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र, तोपर्यंत पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments