बल्लारपूर तालुका विसापूरच्या क्रीडा संकुलातुन दीड लाखाच्या लोखंडी प्लेटाची चोरी

 



बल्लारपूर तालुका  विसापूरच्या क्रीडा संकुलातुन दीड लाखाच्या लोखंडी प्लेटाची चोरी

◾१२० लोखंडी प्लेटाची चोरी

◾बांधकाम कंत्राटदारांनी अजूनही क्रीडा संकुल सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रशासनाकडे हस्तांतरन केले नाही

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्राचे माजी वित्त, वन व नियोजन मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार   यांचं ड्रीम प्रकल्प असलेला बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल ज्याला पूर्व प्रधानमंत्री स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले व जवळपास ४० कोटी ३३ लाख रु च्या आधारावर निर्माण झालेले विशेष म्हणजे प्रसिध्द सिने अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते उदघाटन झालेले क्रीडा संकुल हे संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे शिवाय या संकुलाच काम प्रगतीपथावर आहे. 

याठिकाणी विजेची सोय योग्य त्या प्रमाणावर नसल्याने बांधकाम कंत्राटदारांनी अजूनही क्रीडा संकुल सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रशासनाकडे हस्तांतरन केले नाही अशातच या क्रीडासंकुल अंतर्गत बनलेल्या जलतरण तलावाच्या जवळपास १२० लोखंडी प्लेट ज्याची किंमत अंदाजित दीड लाख रु चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सदर घटनेची माहिती होताच येथील व्यवस्थापक प्रसाद प्रभाकर पाटकर यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर बल्लारपूर पोलिसांनी विकास उर्फ डुक्कर काट्या अजित पुरी वय-२३ रा.कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर व अर्जुन उर्फ अजय संजय चांदेकर वय-१९ यांना अटक करून यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बल्लारपूरातील २ भंगार व्यावसायिका कडून ६१ प्लेट तर क्रीडा संकुल लगतच्या ओसाड घरातून १३ प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत तसेच अजूनही ४६ प्लेट मिळाल्या नसून यासबंधीचा पोलीस तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड व त्यांची डीबी पथक करीत आहे.

Post a Comment

0 Comments