अन महाराष्ट्र एक्सप्रेस चक्क शासनाच्या विकासकामाची माहिती घेऊन धावली

 



अन महाराष्ट्र एक्सप्रेस चक्क शासनाच्या विकासकामाची माहिती घेऊन धावली 

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज रोजच्या सारखेच महाराष्ट्र एक्सप्रेसचे भंडारा रोड रेल्वे स्थानकावर आगमन झाले. मात्र आज आलेली रेल्वेगाडी ही काहीशी वेगळी व छायाचित्रांनी सजलेली होती. गेल्या दोन वर्षातील शासनाच्या विकास कामांची माहिती आज या गाडीच्या डब्यांवर रेखाटलेली होती. नेहमी प्रवाशांना घेवून धावणारी ही एक्सप्रेस विकास कामांची माहिती घेवून धावत होती. 

 गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वेच्या डब्यांचा वापर पहिल्यांदाच करण्यात येत आहे. कोल्हापूर-गोंदिया या सारख्या लांब पल्ल्यांच्या पाच एक्सप्रेस गाड्यांव्दारे ही माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आपला महाराष्ट्र आपले सरकार ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्यास कोरोना काळात देण्यात आलेले प्राधान्य, शेती, क्रीडा, सामाजिक या क्षेत्रात वेगवेगळ्या आघाडीवर झालेल्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी ते 1 मार्च या महिन्याभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments