यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पद्मविभूषण बाबा आमटे यांना आदरांजली

 




यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पद्मविभूषण बाबा आमटे यांना आदरांजली


   चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) :  ज्येष्ठ समाज सेवक पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या पूण्यतिथी निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, एम. ई. एल प्रभाग प्रमुख आशा देशमुख, दौलत मानकर, पुरुषोत्तम कुडे, शेषराव गोस्वामी,  मंगला वायकोर, मिराबाई निखाडे, पुष्पा कुडे, उर्मिला कळंबे, विनू मांडवगडे, मायाबाई सुरतीकार आदिंची उपस्थिती होती.

    कुष्ठरोग्यांची सेवा व गोरगरीबांची व्यथा ऐकुन त्यांना मदतीचा हात देणारे थोर सामाजिक कार्यकर्ता पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या पुण्यतिथी निमित्य एमईएल प्रभागात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिप प्रज्वलित करत त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पद्मविभूषण बाबा आमटे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी समाजसेवक बाबा आमटे यांच्या जिवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments