" द बर्निंग ट्रॅव्हल्स " चा थरार जिवीत हानी टळली

 



" द बर्निंग ट्रॅव्हल्स "  चा थरार जिवीत हानी टळली

 ◾चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळ खाजगी ट्रॅव्हल्स ने अचानक पेट घेतल्याने पूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा जवळ चालत्या खाजगी ट्रॅव्हल्स ने अचानक पेट घेतल्याने पूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची वृत्त आहे यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रॅव्हल्स चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या संदर्भातील अधिक माहितीनुसार आज ८ फरवरीला दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान चंद्रपूर वरून गडचिरोली ला जाणारी नारायण कँपणीची ट्रॅव्हल्स ला लोहारा गावाजवळ धूर निघतांना दिसून आला पाहता पाहता ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रॅव्हल्स चालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

Post a Comment

0 Comments