समाज मन सुन्न करणारी घटना : पोटच्या मुलाने केला जन्मदात्या वडिलांचा कुऱ्हाडीने खुण !

 



समाज मन सुन्न करणारी घटना : पोटच्या मुलाने केला जन्मदात्या वडिलांचा कुऱ्हाडीने खुण !

 ◾गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या जवळील विसापूर टोला या गावात एक धक्कादायक घटना घडली 

गडचिरोली ( राज्य रिपोर्टर ) : गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या जवळील विसापूर टोला या गावात एक धक्कादायक घटना घडली या गावात एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केला असल्याची घटना आज ३ फरवरिला उघडकीस आली यासंदर्भातील अधिक माहितीनुसार मृतक दामोधर तागडे वय-५५ वर्ष, तर आरोपी मुलगा तेजस दामोधर तागडे वय-२४ वर्ष रा.विसापूर टोला असून त्याने आपल्या वडिलांचा खून करून पसार झाला होता मात्र गडचिरोली पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशन वरून तपास करून अवघ्या २ तासात गडचिरोली एसटी डेपो परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर घटना घडल्याची माहिती कळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करून शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याविषयीच्या अधिक माहितीनुसार मृतक दामोधर यांना २ मुलं असून मोठा मुलगा हा पोलीस विभागात कार्यरत आहे तर लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता त्याने दारूच्या नशेत वडिलांशी वाद घातला व या वादातून मुलाने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली असल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले. याविषयीचा पुढील तपास अंकित गोयल पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावंडे, सपोनि चेतन चव्हाण गडचिरोली पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments