गणेश चतुर्थी निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध गणेश मंदिरांमध्ये लाडू वाटप

 



गणेश चतुर्थी निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध गणेश मंदिरांमध्ये लाडू वाटप

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : गणेश चतुर्थी निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने लाडू वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी घूग्घूस, पडोली आणि शहरातील 16 गणेश मंदिरात पुजा आर्चना करुन लाडू वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

   दरवर्षी प्रमाणे यंदा ही गणेश चतुर्थी निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध गणेश मंदिरात धार्मीक कार्यक्रम व लाडू वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकमान्य टिळक शाळेसमोरील गणेश मंदिर, जटपुरा गेट गणेश मंदिर, विठ्ठल मंदिर वार्ड गणेश मंदिर,  राष्ट्रवादी नगर गणेश मंदिर, भिवापूर वार्ड  ओमनगर येथील गणेश मंदिर, दादमहल वार्ड गणेश मंदिर, हवेली गार्डन जवळील गणेश मंदिर, तुकुम येथील गणेश नगर गणपती मंदिर,  अंचलेश्वर वार्ड गणेश मंदिर,  बालाजी वार्ड येथील गणेश मंदिर श्याम नगर येथील गणेश मंदिर यासह शहरातील इतर व घुग्घूस आणि पडोली येथील गणेश मंदिरांमध्ये  सदर लाडू वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम यंग चांदा ब्रिगेडच्या शाखा प्रमूखांनी सदर गणेश मंदिरात गणरायांची पुर्जा अर्चणा करत चंद्रपूरकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी मनोकामना केली. यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने प्रसाद स्वरुपी लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments