मेरी आवाज ही पहचान हे....! गानसम्राज्ञी लता दीदी सदैव स्मरणात राहतील - आ. किशोर जोरगेवार

 



मेरी आवाज ही पहचान हे....!

गानसम्राज्ञी लता दीदी सदैव स्मरणात राहतील - आ. किशोर जोरगेवार 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्वर्गीय आवाजाच्या धनी, विश्वप्रसिध्द गायिका भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. लता दीदीच्या जाण्याने एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून निघणे कधीही शक्य नाही. गानसम्राज्ञी लता दीदी आपल्याला सोडून जाण हे फक्त शब्दातील आहे, वास्तविकतेमध्ये त्या आपल्या सुरेल गाण्यांच्या आठवणीने सगळ्यांच्या स्मरणात सदैव राहतील. अश्या भावना आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल्या आहे. 

“मेरी आवाज ही पहचान हे...” “ज्योती कलश झलके..” “तुम आ गये हो...” या सारख्या अगणित सदाबहार लतादीदींनी गायलेली गाणे ऐकतच आमची पिढी मोठी झाली आहे. त्यांनी गायलेली भजने घरोघरी आज पण ऐकायला मिळते. त्यांचा स्वर्गीय आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करणारा होता. “ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी...” या सारखे देशभक्तीपर गीते ऐकून तरुणांच्या नसानसात देशप्रेम जागृत होतो. त्यांना भेटीकरिता जाणार होतो, परंतु प्रकृती अस्वस्थामुळे भेट न झाल्याची खंत आ. किशोर जोरगेवारांनी व्यक्त केली. त्यांच्या अश्या जाण्याने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची सुरेख गाणी ऐकून मोठी झालेली पिढी आणि त्यांच्या गाण्याचे रियाज करून संगीतविश्वात पदार्पण करणाऱ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात त्या सदैव राहणार आहे. आज त्यांच्या सहवास जरी नसला तरी त्यांच्या स्मृति सुगंध देत राहील, त्यांचा रुपात देशाने एक गौरव हरवला आहे. अश्या शब्दात आ. किशोर जोरगेवार यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Post a Comment

0 Comments