लहान भावांनी केली मोठ्या भावाची हत्या

  



लहान भावांनी केली मोठ्या भावाची हत्या 

◾दगडाने डोक ठेचून केला खून,  घटनास्थळी मृत्यू 

नागभीड ( राज्य रिपोर्टर ) : तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत भट्टी वार्ड क्रमांक ४, झेंडा चौक येथे आज भावानेच पूर्ववैमनस्यातून मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, मृतक राजेश्वर भिवाजी जुमडे ( ६५ ) याचा खून त्याच्याच लहान भाऊ बंडू भिवाजी जुमडे ( ६२ ) याने केल्याची घटना आज दुपारी १२:३० ला उघडकीस आली. हा खून त्याने दगडाने डोक ठेचून केला, राजेश्वर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच  तळोधी बाळापूर येथील ए.पी.आय, डि.आर. शेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक, आकाश कुमार साखरे, सहाय्यक फौजदार बलदारखा पठान, हवालदार पानसे, हवालदार आंबेकर, पो.कांस्टेबल निंबेकर ई करीत आहेत.

Post a Comment

0 Comments