मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने श्री सुधीरभाऊ फॅन्स क्लब च्या वतीने २०० विद्यार्थ्याना वही व पेन चे वाटप

 


मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने श्री सुधीरभाऊ फॅन्स क्लब च्या वतीने २०० विद्यार्थ्याना वही व पेन चे वाटप

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बाबासाहेबांची सावली आणि आम्हा बहुजनांची माऊली त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती आपली इच्छा, आकांक्षा बाजूला ठेऊन संसारात स्वतः ला झोकून दिले. वयक्तिक आयुष्यात अनेक संकटे आली गरिबीला संघर्षाला तोंड दिले पण माघार नाही घेतली. आपण केलेल्या कार्याला मनःपूर्वक कोटी कोटी वंदन., अशा त्यागाची परिभाषा, संघर्ष मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे मंगलमय सदिच्छा. तसेच माता रमाई यांच्या जयंती निमित्त श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे महाराणा प्रताप वॉर्ड व दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर येथील 200 मुलांना वह्या पेन देऊन साजरा करण्यात आला. या समाजकार्यात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्री श्रीकांत आंबेकर जी, पत्रकार मुन्ना खेडेकर जी,समाजसेवक प्रकाश दोतपेल्ली जी, कैलाश गुप्ता जी, सुधाकर सिक्का जी, संजय वाजपेयी जी, राजेश कैथवास जी, रिंकू गुप्ता जी, श्रवण शिवणकर जी, पेरका जी, अनिकेत पोतर्लावार जी तसेंच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments