शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबवत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी

 



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबवत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी


    चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांनी देशाला स्वच्छतेचा संदेश देत समाज परिवर्तनाचे काम केले. आज त्यांच्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे स्वच्छता अभियान राबवत त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक पंकज गुप्ता, तापूष डे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कूळमेथे, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे यूथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, प्रभाकर धांडे अध्यक्ष, वेकोली विभाग यंग चांदा ब्रिगेड,  युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, कौशर खान, राहुल मोहुर्ले, आशा देशमूख, विमल कातकर, वैशाली रामटेके, दुर्गा वैरागडे, नंदा पंधरे, चंद्रशेखर देशमुख, बादल हजारे, अस्मिता दोनाडकर, अनिता झाडे, सविता दंडारे, वैशाली मद्दीवार, शमा काजी, स्मिता वैद्य आदिंची उपस्थिती होती.

  ज्या महापुरुषांवर आधुनिक भारताचा अभिमान असावा, त्यामध्ये संत गाडगे बाबांचे नाव सर्वोच्च आहे, पायात फाटलेल्या चप्पल आणि डोक्यावर मातीचा वाडगा घेऊन, गावांची साफसफाई केल्यानंतर ते संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करायचे आणि आपल्या कीर्तनांव्दारे लोकांमध्ये परोपकार आणि समाज कल्याण विषयी प्रबोधन करायचे. त्यांच्या कीर्तनांच्या वेळी ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनांविरूद्ध शिक्षण देत असत. त्यांनी आपल्या कृतीतून देशाला स्वच्छतेचा संदेश दिला. दरम्याण आज त्यांच्या जयंती दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्याल, रुग्णालय येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालय परिसरात एकत्रीत येत स्वच्छता अभियान राबविले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रुग्णालय परिसर झाडून स्वच्छ केला. या उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments