राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज भवणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी देणार - आ. किशोर जोरगेवार

 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज भवणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी देणार - आ. किशोर जोरगेवार

◾शिव जयंती निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडा मंडळाच्या वतीने महिला भजन सम्मेलनाचे आयोजन.


         चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :   रयतेचे राजे शिव छत्रपती महाराज यांची जयंती साजरी करत असतांना त्यांचा पराक्रमी ईतिहास डोळ्या समोर येत आहे. रयत हिच परमेश्वर समजून त्यांनी रयतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या राज्यात जनता सुखवाह होती. आज तिच व्यवस्था पून्हा उभी करण्याची गरज आहे. यासाठी समाज प्रबोधन गरजेचे आहे. आणि हेच काम श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सातत्याने केल्या जात आहे. त्यांचे हे कार्य आणखी गतिशील व्हावे याकरिता माझे नेहमी सहकार्य राहणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाज भवणासाठी आपण २५ लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    शिव जयंती निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडा मंडळच्या वतीने इंदिरा नगर येथे महिला भजन संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष नागेश टोंगे, उपाध्यक्ष संदिप कांडे, सचिव अनिल गेडाम, विशाल हिंगे, सोनू गेडाम यांच्यासह मंडळाच्या इतर पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.

  यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, छत्रपत्री शिवाजी महाराज यांनी चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी त्याकाळी प्रयत्न केले. पूढे संतानीही या कार्यासाठी पूढाकार घेलता. प्रबोधनाच्या माध्यमातून नागरिकांना जागृत करण्याचे काम सतांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण देशभर फिरून वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सर्वधर्मसमभाव, महिलांचे सशक्तीकरण, तरुणांची बालोपासना, आणि अध्यात्मिक विकास हे समाज सुदृढ करणारे त्यांचे मापदंड होते. देशातील तरुण आणि महिला हे देशोन्नतीला कसे काय सहाय्यक ठरू शकतील याचे प्रबोधन वारंवार ते आपल्या कीर्तनातून करत. खंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे उत्तमरित्या केले जात आहे. शहरासह गावपातळीवर गुरुदेव सेवा मंडळाच्या सक्रिय शाखा सुरु करण्यात आल्या आहे. यातून सुसंस्कृत समाजाची निर्मिती केल्या जात असल्याचे ते यावेळी म्हणाले, त्यांच्या या कार्यात माझा नेहमीच सहभाग राहिला आहे. आणि तो पूढेही राहणार अशी ग्याही यावेळी त्यांनी दिली. हे काम करत असतांना गुरुदेव सेवा मंडळासमोर येणा-या अडचणींचीही मला जाण असून त्या सुटेल या दिशेने आपले प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी बोलले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाज भवनासाठी आपण २५ लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. भविष्यात या भवणातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहचेल अशी आशाही यावेळी बोलतांना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला हेमलता पोईनकर, मिना वडलकोंडावार, बेबी दाते, वैशाली वेलपूलवार, मनिषा हलमारे, साधना हणुमंते, रेखा कापटे, अरुना कापेटे, संगीता खांडरे यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments