‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

 



‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा 

Ø 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

 चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर ) भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. या मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा, व्हिडिओ मेंकीग स्पर्धा, भित्तीचित्र पोस्टर डिझाईन स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा या पाच प्रकारच्या स्पर्धांचा  समावेश असून  दि. 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहेत.

‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित करून निवडणूक आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करण्यात येत आहे. ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा असून प्रश्नमंजूषा स्पर्धेद्वारे निवडणुकीबाबत जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे, नियम व अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेच्या https://ecisveep.nic.in/contest/www.voterawarenesscontest.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. स्पर्धांचे संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, सोशल मिडीयावर विशेष ओळख तसेच भारत निवडणूक आयोगाचे नाव असणाऱ्या वस्तू, ई-प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धकांनी आपला प्रवेश अर्ज voter-contest@eci.gov.in वर पाठवावेत. तरी, जास्तीत जास्त जनतेने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करण्यास मदत करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments