वन्यजिव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी हिंसक प्राण्यांना हद्दपार करा - आ. किशोर जोरगेवार

 



वन्यजिव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी हिंसक प्राण्यांना हद्दपार करा - आ. किशोर जोरगेवार

◾अधिकाऱ्यांसह वाघाची दहशत असलेल्या भागाची पाहणी, नितिन भटारकर यांच्या उपोषण स्थळीही भेट.

 चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) :  आठवडा भरात बिबट्याच्या हल्यात सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर परिसरातील दोघांचा हकनाक बळी गेला आहे. असे असतांनाही सि.एस.टी.पी.एसच्या हद्दीत सुरु असलेला वन्यजिव व मानवी संघर्ष टाळण्याबाबत उपाय योजना करण्यापेक्षा सि.एस.टी.पी.एस.ला नको त्या कामांवर पैसा खर्च करणे महत्वाचे वाटत आहे. अशा शब्दात संताप व्यक्त करत वन विभागाने हिंसक जंगली प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करत वन्यजिव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी येथील हिंसक  प्राण्यांना येथून हद्दपार करावे तर सि.एस.टी.पी.एस.च्या कामगारांची सुरक्षा सि.एस.टी.पी.एस.ने घेत कामगारांना सुरक्षा साधने देत वन्यजिव हल्यांपासून बचाव करण्याचे प्रशिक्षण द्यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सि.एस.टी.पी.एस व वनविभागाला केल्या आहे.

  आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सि.एस.टी.पी.एस. व वनविभाग अधिकाऱ्यांची बैठक घेत वाघाची दहशत असलेल्या परिसराची पाहणी केली. या प्रसंगी  सि.एस.टी.पी.एस.चे मुख्य अभियंता पंकज सपाटे, मुख्य वन संरक्षक, प्रवीण कुमार, मुख्य वन संरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, जितेंद्र रामगावकर, उपवन संरक्षक खाडे, सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे, डब्लू ओ वाघमारे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     यावेळी हिंसक जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करा या मागणी करिता उपोषणावर बसलेले राष्ट्रवादी कॉग्रेस युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपोषण पेंडाललाही भेट देत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर भागात जंगली हिंसक प्राण्यांचा मोठा वावर आहे. त्यामूळे येथे मानवी व वन्यजिव संघर्ष शिगेला पोहचला आहे. यात अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करुन तिला ठार केले होते. त्यानंतर एका वाघीनीने कामगारावर हल्ला करुन त्याला जखमी केले. तर मागील दोन दिवसात बिबट्याने एकाचा तर वाघाने एकाचा बळी घेतला. यात एका कामगाराचा व 15 वर्षीय युवकाचा समावेश आहे. वारंवार घडत असलेल्या या घटनानंतरही वनविभाग गंभिर नसल्याचे दिसुन येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळाची पाहणी करत सि.एस.टी.पी.एस. आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. वन्य जिवांच्या हल्यात मानसांचा हकणाक बळी जात असतांना वन विभाग नको त्या कामात अधिक व्यस्तता दाखवत असल्याचे ते यावेळी म्हणाले, वन्यजिव व मानवी संघर्ष टाळण्याच्या दिशेने वनविभागाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. सि.एस.टी.पी.एस.च्या हद्दीतही जंगली हिंसक प्राण्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामूळे वन विभागासह सि.एस.टी.पी.एस.ही याला जबाबदार आहे. याबाबत सि.एस.टी.पी.एसनेही उपाययोजना केली पाहिजे होती. सि.एस.टी.पी.एस.च्या वतीने जंगला लगत कटघर बांधण्यात येणे आवश्यक होते. या सर्व आवश्यक कामांकडे लक्ष देण्यापेक्षा सि.एस.टी.पी.एस.ला नको त्या कामांवर पैसा खर्च करणे आवश्यक वाटत आहे. मात्र आता हा प्रकार चालनार नाही. नागरिकांच्या सुरक्षेची समजवता खपवून घेतला जाणार नाही असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सि.एस.टी.पी.एसचे जवळपास ७ हजार कामगार वाघांच्या दहशतीत काम करत आहे. त्यामूळे या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी सि.एस.टी.पी.एसने स्विकारली पाहिजे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. सोबतच या भागात गस्त घालणा-या वन विभागाच्या पथकांमध्ये वाढ करण्यात यावी, येथील कामगारांना वन्य जिवांच्या हल्ल्यातून बचाव करणारे व्हाईस गण, लेजर लाईट गण व इतर आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करुन देण्यात यावे, वनविभागाकडून कामगारांना प्रशिक्षीत करण्यात यावे, या भागात वावर असलेल्या हिंसक प्राण्यांचे स्थलांतरण करण्यात यावे,  रात्री लाईटची सोय उपलब्ध करावी, रस्त्या लगतचे झाडे झुडपी साफ करण्यात यावी यासह अनेक सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर बैठकीत केल्या आहेत. सदर हिंसक प्राण्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी उपोषणावर बसलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक अध्यक्ष नितीन भटारकर यांच्या पेंडाललाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे. यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ प्रमूख राशेद हुसेन विज कामगार सेनेचे हेरमन जोसेफ, विश्वजित शहा, आनंद इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments