यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली

 



यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  ज्येष्ठ गायिका गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कार्यालात श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करुन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे,  युवा नेते अमोल शेंडे, सायली येरणे, विमल काटकर, अल्पसंख्याक विभागाच्या शहर महिला प्रमूख कौसर खान, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, गौरव जोरगेवार, वैशाली मेश्राम, आशा देशमूख, माधूरी निवलकर, शमा काजी, अनिता झाडे, अल्का मेश्राम, दुर्गा वैरागडे, शांता धांडे,  राम जंगम, विनोद अनंतवार, चंद्रशेखर देशमुख, बादल हजारे आदिंची उपस्थिती होती.

   गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दरम्याण आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात लता मंगेशकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिप प्रज्वलित करुन त्यांच्या प्रतिमेला पूष्पगुच्छ अर्पण करत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटांचा मौन पाळला. भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यातून त्या नेहमी स्मरणात राहतील. स्थानिक 36 भाषांमध्ये 50 हजाराहून अधिक गाणे त्यांनी गायलीत. त्यांचे गाणे ऐकत आम्ही मोठे झालोत. इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांनी जोपासलेल्या साधेपणामूळे त्या साऱ्यांनाच आपल्यासा वाटायच्या. त्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांचे बाल पणात आमच्यावर संस्कार झालेत अशी प्रतिक्रिया यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments