सतगुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज - आ. किशोर जोरगेवार

 



सतगुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज - आ. किशोर जोरगेवार

◾बंजारा समाजाच्या वतीने संत श्री. सेवालाल महाराज जयंती साजरी


 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :   रूढी परंपराने मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सतगुरु श्री सेवालाल महाराज यांच्या मनात आली त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करत मानवी जिवनाचे कल्यान करण्याचा विचार समाजामध्ये रुजवला आज 283 वर्षा नंतरही त्यांच्या विचारांची समाजाचा गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     आज मंगळवारी चिंचाळा येथे सतगुरु संत श्री. सेवालाल महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अशोक राठोड, संजय राठोड, ग्रामपंचायत सदस्य सुर्वणा आसुटकर, कमला शेंडे, प्रकाश शेंडे, शिक्षक राकेश पिंपळकर, कैलाश खुजे, धनंजय पिंपळशेंडे, पियुष भोगेकर, आदित्य निकुरे, तृप्तेष माशीरकर, साहिल दागमवार, राहुल त्रिंबके आदिंची उपस्थिती होती.

  यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, बंजारा समाजातील प्रश्नांची मला कल्पना आहे. यातील राज्य स्तरावरील प्रश्न योग्य ठिकाणी मांडण्याचे काम मी करणार आहे. नौकरी संदर्भातील, कास्ट सर्टिफिकेट या संदर्भातील अडचणीही समाजापूढे आहे. त्यांनाही न्याय देण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.

      येथील वसंतराव नाईक चौकाचीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. या प्रसंगी संत सेवालाल महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी चिंचाळा येथील बंजारा समाजाच्या अभ्यासीकेला संगणक आणि पुस्तक देण्याची घोषणाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. समाजातील युवकांनी शिक्षीत होऊन समाज सक्षमीकरणासाठी काम करावे अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी बोलून दाखवली. समाजाने जागा उपलब्ध करुन दिल्यास समाजील गरजू विद्यार्थांसाठी सर्व सोई सुविधायुक्त अद्यावत अभ्यासीका तयार करण्यासाठी 25 लक्ष रुपयांना निधी उपलब्ध करुन देईल असेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी जगतगुरु संत श्री. सेवालाल महाराज आणि माँ जगदंबा देवीचे चे दर्शन घेतले. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Post a Comment

1 Comments

  1. जिस सीट से चुनाव में चुनकर आया , उस समाज को आज तक उनके हक और अधिकार के लिए विधानसभा में आवाज नही उठाया , आप क्या बंजारा समाज की आवाज विधानसभा में उठाएगा ???

    ReplyDelete