दुसऱ्या दिवशी बिबट्याने पुन्हा एका १६ वर्षीय मुलाला उचलून नेले

  



दुसऱ्या दिवशी बिबट्याने पुन्हा एका १६ वर्षीय मुलाला उचलून नेले 

◾ दुर्गापूर नेरी येथील घटना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : बुधवारच्या रात्री चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कामगार भोजराज मेश्राम यांना बिबट्याने उचलून नेत ठार केल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच दुर्गापूर नेरी येथे राहणारा १६ वर्षीय मुलगा राज भडके याला गुरुवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळं या परिसरात चांगलीच दहशत माजली आहे. दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या मागच्या बाजूने राज जात असतांना बिबट्याने हल्ला केल्याचं वृत्त आहे या घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनविभागाच्या चमू ने युध्द स्तरावर शोध कार्य सुरू केले आहे सद्यस्थितीत मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाली आहे जरी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करून वन्यप्राण्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत असला तरी मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाली असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.



Post a Comment

0 Comments