मयात्मज सुतार ( झाडे ) समाज चंद्रपूर आयोजित श्री प्रभु विश्वकर्मा जयंती महोत्सव आनंदात साजरा.

 





मयात्मज सुतार ( झाडे ) समाज चंद्रपूर आयोजित श्री प्रभु विश्वकर्मा जयंती महोत्सव आनंदात साजरा.

◾जागृती महिला मंच युवा मंच चंद्रपूर अंतर्गत श्री प्रभु विश्वकर्मा जयंती साजरी 


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मयात्मज सुतार ( झाडे ) समाज कार्यकारीणी जागृती महिला मंच युवा मंच चंद्रपूर अंतर्गत श्री प्रभु विश्वकर्मा जयंती साजरी करन्यात आली.  

ह्यावेळी सकाळी ९:३० वाजता विश्वकर्मा चौक बालाजी वार्ड, चंद्रपूर येते श्री.प्रभु विश्वकर्मा मुर्ती व प्रतिमेचे विधिवत पुजन व आरती करून सुरवात झाली. त्यावेळी वार्डातील जेष्ठ नागरिक व समाज पदाधिकारी सदस्य होते त्याच प्रमाणे श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर एकोरी वार्ड येथे श्री प्रभु विश्वकर्मा चे अभिषेक पुजन व आरती करन्यात आली ह्या पुजेचा मान समाजाचे अध्यक्ष श्री. महेश लक्ष्मणराव शास्त्रकर व त्यांच्या अर्धांगिनी सौ.ललिता महेश शास्त्रकर यांना देण्यात आला. 

तसेच सकाळी १०:३०ला रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात जवळपास ४५-४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच कार्यक्रमात जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते काल झालेल्या  चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक स्व.श्री.रमेशराव पांडुरंग जी बुरडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आले  त्यावेळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री.अरूणराव बुरडकर,श्री. पंजाबराव ( बाबाजी ) दुधलकर, विश्वकर्मा नागरी सहकारी पतं संस्थेचे अध्यक्ष श्री. माणिकराव गहुकर, श्री.महेश शास्त्रकर यांचे तर्फे पारितोषिक विजेत्यांना देण्यात आले.

 चित्रकला स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक कु.प्राजक्ता निमसरकर हिला देवा बुरडकर व शुभांगी देवा बुरडकर यांचे तर्फे प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक विक्रम बुरडकर याला श्री.सुरेश पां.बुरडकर यांचे तर्फे प्रदान करण्यात आले. तर तृतीय क्रमांक अनन्या बुरडकर हिला श्री.अरूणराव बुरडकर श्री.महेश शास्त्रकर,श्री.संजय शास्त्रकर,यांचे हस्ते देण्यात आले. तसेच  पारितोषिक विजेत्यांना श्री.देवा बुरडकर यांचे कडुन स्व.श्री.रमेशराव पांडुरंग जी बुरडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आले.  त्यानंतर चंद्रपूरातील  महाराष्ट्र राज्य महासंघ युवा मंच व सखी महिला मंच च्या अध्यक्ष,सचिव, यांचे सत्कार तसेच स्थानिक कार्यकारीणी मद्ये जागृती महिला मंच नवनिर्वाचित कार्यकारीणी पदाधिकारी व युवा मंच नवनिर्वाचित कार्यकारीणी पदाधिकारी यांचे स्वागत करन्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ.कल्पना धनंजय शास्त्रकर व श्री.सुयोग वि.धनवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.रविंन्द्र बापुराव बुरडकर यांनी केले त्यानंतर महाप्रसाद वितरण करून रात्री ७:०० वाजता भजन कीर्तन कार्यक्रम सादर करन्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments