म.रा.म.पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवस निमित्त ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे फळ वितरण

 


म.रा.म.पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवस निमित्त ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे फळ वितरण 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म.रा.म.पत्रकार संघ शाखा बल्लारपूर च्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील रुग्णांना फळ वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कळसकर, डॉ.गजानन मेश्राम यांची उपस्थिती होती प्रथम पुष्पगुच्छ देऊन वैद्यकीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला तदनंतर या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळ-बिस्कीट वितरण करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, मुन्ना खेडकर, विशाल डुंबेरे, दिपक भगत, वसंत मुन, धनंजय पांढरे, शीतल बेताल, राजू राठोड, गणेश टोंगे, श्रीनिवास सिंगाराव ई ची प्रामुख्याने उपस्थिती होती विशेष म्हणजे नेहमी रुग्णांना फळ वितरण करण्यात येते मात्र रुग्णांची मनोभावे सेवा करणाऱ्या पारिचारिकांनाही फळ वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments