मांगरुड ग्रामपंचायतच्या संगणक आँपरेटरची हिटलरशाहीने जनता त्रस्त असून त्यांना या पदावरुन हटविण्याची मागणी

 




मांगरुड ग्रामपंचायतच्या संगणक आँपरेटरची हिटलरशाहीने जनता त्रस्त असून त्यांना या पदावरुन हटविण्याची  मागणी

◾जनता त्रस्त, १६५ गावकऱ्यांचे निवेदन. 


 नागभीड ( राज्य रिपोर्टर ) : तालुक्यात येत असलेल्या मांगरुड ग्रामपंचायतच्या ७ ग़ा. प. सदस्य संख्या असलेल्या गावातील नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालकाचे  काम करणाऱ्या प्रशांत गोवर्धन मेश्राम यांच्या हिटलरशाहीने जनता त्रस्त असून त्यांना या पदावरुन हटविण्याची  मागणी श्रीकांत मुनरत्तीवार व १६५ गावकरी वर्गाच्या वतीने  एका निवेदन व्दारे करण्यात आली आहे .

          मांगरुड येथील नागरिकांच्या वतीने कामानिमित्त कुठलेही दाखले मागीतले असता संगणक परिचालक ग्रामपंचायत मालकीचा लँपटाप घरीच ठेवून कामात दिरगांई करीत असल्यामुळे  व उद्धटपणे वागत असल्याने लोकांचे काम वेळेवर होत नसल्यामुळे जनता कंटाळली आहे .तसेच त्याच्या अरेरावी पणामुळे गावातील नागरिकांच्या वतीने संगणक परिचालक हटविण्यासाठी १६५ नागरिकांचे  स्वाक्षरी मोहीम घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाला हटविण्याची मागणी केली आहे .संगणक परिचालकाला न हटविल्यास आंदोलन करण्याची मागणी गावकरी वर्गाच्या वतीने करण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments