किड्स फॅशन & मिस ,चंद्रपूर आयडल 2022,फॅशन शो ची विजेता सी. मधे बल्लारपूर निवासी कु. सेजल नंदकिशोर सातपुते ठरली


किड्स फॅशन & मिस ,चंद्रपूर आयडल 2022,फॅशन शो  ची  विजेता सी. मधे बल्लारपूर निवासी कु. सेजल नंदकिशोर सातपुते ठरली

 


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : किड्स फॅशन  फॅशन शो करीता नाळ सिनेमातील बाल कलाकार नाळ सिनेमा फेम श्रीनिवास पोकळे हा नॅशनल फिल्म अवॉर्ड  विजेता बालकलाकार याची प्रामुख्याने उपस्थिती..

31 जानेवारी 2022 ला हा कार्यक्रम प्रियदर्शिनी सभागृह,चंद्रपूर येथे मंदा कोपुलवार ,विनय तितरे यांनी आयोजित केला होता. 

या फॅशन शो करीता नाळ सिनेमातील बाल कलाकार याला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . कार्यक्रमात माननीय पप्पू देशमुख ,शहर विकास आघाडी गट नेते आणि वडगाव प्रभाग नगरसेवक हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तर अमेय काबरा सर, श्री. संजय वैद्यजी माजी नगरसेवक,सुशीला पोरेड्डीवार मॅडम,JCI राजुरा रॉयल प्रेसिडेंट, सीमा पाटील मॅडम जेष्ठ कवियत्री,नम्रता राऊत मॅडम,,उदय चाकोते सर ,अमरावती ,सुशील सहारे सर राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   

सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली  या फॅशन शो चे उत्कृष्ट संचलन नौशाद सिद्दीकी यांनी केले.  एकूण 42 स्पर्धकांनी यात सहभागी घेतला होता. सर्व स्पर्धक 3 ते 12 वर्षातील वयोगटातील होते,प्रामुख्याने फक्त लहान मुलांकरिता आयोजित केलेला हा चंद्रपुरातील पहिलाच फॅशन शो होता,कारण ही तसेच होते की या खास शो करीता येणारा पाहुणा बालकलाकार श्रीनिवास पोकळे याची उपस्थिती राहणार होती ,रॅम्प वर श्रीनिवास ची खूपच धमाकेदार एन्ट्री झाली प्रचंड उत्साही वातावरण ,पालकांचा जोरदार चिअर अप,सर्व स्पर्धक मुलांना या छोट्या हिरो सोबत एक फोटो ची उत्सुकता ,तसेच खूप कमी गर्दी,कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आयोजकांनी कुठेच कमतरता ठेवली नाही , या फॅशन शो मधे ग्रुप ..सी मधे बल्लारपूर निवासी कु सेजल नंदी सातपुते हिने प्रथम चा बहुमान प्राप्त झाला miss chandrapur idol -2k22 winner चा बहुमान मिळाला.

 कु.सेजल सातपुते हिला विशेष  टाईटल्स, ट्रॉफी,प्रमाणपत्र ,व crown देऊन सन्मान करण्यात आलाआले,  परीक्षक म्हणून वीरश्री खोब्रागडे,शुभम गोविंदवार हे होते, या लहान मुलांच्या फॅशन शो मधे 3 ते 12  वयोगटातील सर्वच मुलांनी खूप सुंदर पारंपारिक, फ़ंकी, वेस्टर्न या तीनही राऊंड चे सादरीकरण केले, या नयनरम्य 3 तासांच्या फॅशन शो मधे श्रीनिवास पोकळे बालकलाकाराची शेवटपर्यंत उपस्थिती,तसेच श्रीनिवास आणि स्टेजवरील मान्यवर ,आयोजक यांच्या हस्ते सर्वच मुलांना सन्मानित करण्यात आले ,फोटो सेशन ही करता येऊ शकले,त्यामुळे छोटी मुलं खूष झाली कु. सेजल ला स्पर्धा प्रशिक्षण साठी शुभम गोविंदवार व विरश्री  खोब्रागडे यांचे अमुल्य मार्गदर्शन मिळाले कु. सेजल ने या आधी मिस टिन इंडिया स्टार 2021 सेंकड रनरअप, बेस्ट वाक टाइटल, मिस चंद्रपूर 2021 first रनरअप , रनरअप किंडस कासमोस युनिवर्स 2022 (  सेंट्रल इंडिया ) हे बहुमान मिळविले पुढे तिच्या यशाबद्दल शिक्षक व हितचिंतक परिवारातील सगळ्यांनी अभिनंदन केले तसेच शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments