काळी-पिवळी व ट्रकचा भीषण अपघात : 1 ठार 16 गंभीर जखमी




काळी-पिवळी व ट्रकचा भीषण अपघात : 1 ठार 16 गंभीर जखमी 

◾वर्धा जिल्ह्यातील जाम-मांडगाव-सेवाग्राम मार्गावर मदनी जवळ

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम जाम मार्गावरील मदनी जवळ दुपारी 3:30 च्या सुमारास काळी पिवळी व ट्रकच्या भिषण अपघातात 1 इसम ठार झाला असुन 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार दुपारी 3:30 ते 4:00 च्या दरम्यान मांडगाव मार्गावरून वर्धा येथे जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 29 T 1881 जात असताना मदनी गावाजवळ काळपिवळी क्रमांक MH-32 B 631 ने समोरून येणाऱ्या ट्रक ला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की काळी पिवळी चे इंजिन पुर्णपणे चपकुन गेले व चालक स्टिअरिंग मधे दबल्या गेला. ह्या अपघाताच्या वेळी काळी पिवळी मधे चालकासह जवळपास 17 प्रवासी होते. घटना कळताच मदनी येथील लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाश्यांना बाहेर काढले व उपचारासाठी सेवाग्राम येथिल रुग्णालयात दाखल केले. बातमी लिहीत पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इंजिनियर शंकर गिरटकर वय अंदाजे 50 वर्ष ह्यांचा मृत्यु झाला असून चालकासह इतर 16 प्रवासी गंभिर जखमी आहेत. ट्रकचालक अय्युब खान युसूफ खान, वय 61वर्ष ह्यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केलं असुन पुढील कारवाई सुरू आहे.



Post a Comment

0 Comments