बल्लारपूर येथील भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला अभिवादन करण्यासाठी राजरत्न आंबेडकर यांचे बल्लारपूर येथे आगमन

 



बल्लारपूर येथील भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला अभिवादन करण्यासाठी  राजरत्न आंबेडकर यांचे बल्लारपूर येथे आगमन



बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : सोमवार दिनांक 10.01.2022 ला सायंकाळी 7 वाजता जे.बी.बी.एस. विदर्भ या बल्लारपूरातील संस्थे मार्फत उभारलेल्या भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभांला अभिवादन करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे बल्लारपूर येथे आगमन झाले.  नगर परिषदेचे सामोर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समिती चे अध्यक्ष संतोष बेताल व इतर शहरातील जनते सोबत राजरत्न आंबेडकर यांना जयभीम चौक येथे आणण्यात आले. सर्व प्रथम शौर्य विजय स्तंभांला राजरत्न आंबेडकर यांचे द्वारा पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या नंतर कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी आंबेडकर यांना नेण्यात आले. राजरत्न आंबेडकर यांचे संतोष बेताल, अध्यक्ष व देशपाल मून, महासचिव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. समितीचे कार्याध्यक्ष अॅड पवन मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर शौर्य विजय स्तंभांच्या उभारणी साठी ज्या कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले त्यांना राजरत्न आंबेडकर यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचे भाषणाला सुरुवात झाली. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की "हा शौर्य विजय स्तंभ जो उभारण्यात आलेला आहे तो भक्तांसाठी पुजेचे स्थान नसून ते प्रत्येक आंबेडकरी व्यक्ती साठी प्रेरणा आणि स्फुर्तिचे स्थान आहे, मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिल".  सदर कार्यक्रमासाठी वातावरण ढगाळ असून सुद्धा त्याला न जुमानता मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन देशपाल मून यांनी केले.



Post a Comment

0 Comments