यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिव्यांगांना व्हिलचेअरचे वाटप

 



यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने  दिव्यांगांना व्हिलचेअरचे वाटप

                                          

         चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात दिव्यांगांना  व्हिलचेअर वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील दिव्यांगांना यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दिव्यागांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले यावेळी विकलांग सेवा संस्थचे अध्यक्ष श्रिराम पान्हेरकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक पंकज गुप्ता, आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

      यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध समाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक उपक्रम राबवत असतांना दिव्यांग हा देखील संस्थेच्या केंद्रस्थानी असून दिव्यागांसाठी अनेक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे. दरम्याण दिव्यांगांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने व्हिलचेअर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अपंगत्वामूळे शारिरिक हालचाल करु न शकणा-या दिव्यागांना व्हिलचेअर वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलतांना दिव्यांग बांधवांना समाजात उत्तमरित्या जगता यावे या करिता आपले प्रयत्न सुरु असल्याचे सांगीतले. दिव्यागांसाठी मदत केंद्रही लकरच सुरु करणार असल्याचे ते यावेळी बोलले. दिव्यागांना दैनंदिन जिवनात आवश्यक असणा-या गोष्टी उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहला असून तिनचाकी सायकल, हाँकरचे यापुर्वी अनेकदा वाटप करण्यात आले आहे. तर आज दिव्यागांच्या मागणी नूसार आपण व्हिलचेअर उपलब्घ करुन दिलेल्या आहे. पूढेही सातत्याने असे उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु राहतील असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणे, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, दुर्गा वैरागडे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमूख कौसर खान, आशा देशमूख, विमल कातकर, अस्मिता डोणारकर, पौर्णिमा बावणे, अल्का मेश्राम, वैशाली मेश्राम, तिरुपती कलगुरुवार यांच्यासह दिव्यागांची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments