बल्लारपूर नगर परिषदेची दंडात्मक कारवाई विनामॉस्क फिरणाऱ्या वर ५० नागरिकांकडून १०,००० रु वसूल

  



बल्लारपूर नगर परिषदेची दंडात्मक कारवाई विनामॉस्क फिरणाऱ्या वर ५० नागरिकांकडून १०,००० रु वसूल

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या ०९ जानेवारी २०२२ च्या आदेशानुसार कोरोनाच्या विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी विनामॉस्क बाहेर फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल या अनुषंगाने बल्लारपूर शहरातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी विनामॉस्क फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळं आज १२ जानेवारी २०२२ पासून बल्लारपूर नगर परिषद, तहसील कार्यालय बल्लारपूर व पोलीस स्टेशन बल्लारपूर च्या माध्यमातून विनामॉस्क फिरणाऱ्या वर ५० नागरिकांकडून प्रत्येकी २०० रु प्रमाणे दंड वसूल करण्यात आला तसेच बल्लारपूर शहरातील आस्थापना चालकांची तपासणी करण्यात येत आहे कोणत्याही दुकानात, हॉटेल, रेस्टॉरंट, ई मध्ये विना लसीकरण ग्राहक वा ईतर व्यक्ती आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ नुसार कारवाई केली जाणार आहे लसीकरण नाही तर प्रवेश नाही या तत्वावर व्यापाऱ्यांनी व्यवस्था करावी आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन विजय सरनाईक, मुख्याअधिकारी नगर परिषद बल्लारपूर, जयवंत काटकर, उपमुख्याधिकारी, संजय राईचंवार तहसीलदार साहेब बल्लारपूर, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर ई नी केले आहे.



Post a Comment

0 Comments