बल्लारपूर च्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी डॉ.विजय कळसकर साहेब यांची नियुक्ती

 



बल्लारपूर च्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी डॉ.विजय कळसकर साहेब यांची  नियुक्ती 

◾१ फरवरी पासून पदभार सांभाळण्याची शक्यता !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या उप जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेले दंबग व दमदार वैद्यकीय अधिक्षक म्हणून  ओळखले जात असलेले डॉ. विजय कळसकर साहेब यांची बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक पदी बदली होत असल्याने ते आता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या 1 फेब्रुवारी 2022 पासून बल्लारपूर शहरातील नवे वैद्यकीय अधिक्षक म्हणून पदभार सांभाळतील. डॉ. विजय कळसकर साहेब यांनी या पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, गडचांदुर, पल्लेझरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे अतिशय चांगल्या प्रकारे वैद्यकीय अधिक्षक म्हणून गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिले आहेत. तसेच पुन्हा एकदा त्यांचे जिल्ह्यात आगमन होत असल्याने त्यांना जवळून ओळखणारे यांनी समाधान व्यक्त केले असून पुन्हा बल्लारपूर शहरात वैद्यकीय दृष्ट्या अनेक सोइ सुविधा डॉ.विजय कळसकर साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल अशी आशा बल्लारपूर करानी व्यक्त केली आहे.



Post a Comment

0 Comments