गुवाहाटी-बिकानेर रेल्वेचा भीषण अपघात : वृत्त येईस्तोवर ४ मृत, १२ जखमी, जखमींची व मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज

 



गुवाहाटी-बिकानेर रेल्वेचा भीषण अपघात : वृत्त येईस्तोवर ४  मृत, १२ जखमी, जखमींची व मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस १५६३३ (अप) आज संध्याकाळी ५ वाजता रुळावरून घसरली आहे. या दुर्घटनेमध्ये ४  मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमध्ये १२ डबे कोलमडले आहे. सध्या बचावासाठी डीआरएम आणि एडीआरएम अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅनसह अनेक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. याप्रकरणी सध्या उच्चस्तरीय रेल्वे सुरक्षा चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांसाठी ५ लाख रुपये तर गंभीर जखमींना १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २५,००० रुपये मदतीची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उद्या या ठिकाणी भेट देणार आहेत. जलपाईगुडी येथील जिल्हा दंडाधिकारी मौमिता गोदारा बसू यांनी याबाबात माहिती देताना सांगितलंय की, "आम्ही आतापर्यंत ४  मृतदेह बाहेर काढले आहेत. १२ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपासच्या सर्व रुग्णालयांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे,"  तसेच या गंभीर अपघातामुळे मृतांची व जखमींची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Post a Comment

0 Comments