प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर

औरंगाबाद ( राज्य रिपोर्टर ) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील विश्रामगृहात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची बैठक ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उच्च न्यायालयचा निकाल त्यांच्या बाजुने लागल्यामुळे त्यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी

अविनाश कुलकर्णी ( संपादक नितीवान ), देवीदास कोळेकर जिल्हा सरचिटणीस ( दैनिक सत्यनीती ), अजमल पठाण ( संपादक शब्दमत ), व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कल्याण देहाडे ( अट्टलमत उपसंपादक ), ग्रामीण जिल्हाध्यक्ष सतिश लोंखडे यांनी नवनिर्वाचित जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. दैनिक लोकमतचे पत्रकार भाऊसाहेब शेजुळ यांची औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी, सुर्यकांत जाधव यांची उपाध्यक्षपदी, इसाक पठाण दैनिक ( दिव्यमराठी ) यांची औरंगाबाद तालुकाध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. अनिल चौधरी, सुनील चौधरी, आदिल खान ( लोकसंवाद ), किशोर जाधव, मुनीर शेख, आण्णासाहेब शिंदे आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थिती होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीस संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.



Post a Comment

0 Comments