चंद्रपुरात नवजात बालकाची चोरी करून विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

 



चंद्रपुरात नवजात बालकाची चोरी करून विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात 

◾नवजात बाळ २,७५,०००/-रू किमतीला विकल्याचे कबुल,  6 आरोपीना केली अटक !

◾१० दिवसाच्या बालकाची चोरी करून विक्री 

◾चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखे पथकासह पुढील कार्यवाही


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : नवजात बालकांची चोरी करून विकणाऱ्या एका टोळीला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने उघडे पाडले असुन चंद्रपूर येथील एका महिलेला तिच्या प्रियकर व त्याच्या मित्रासह तर नागपूर येथिल 3 महिलांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे की दि. १३/०१/२०२२ च्या रात्री चंद्रपूरच्या शासकिय रूग्णालयात पिडीत महीलेने एका बाळाला जन्म दिला. सदर महीला रुग्णालयात दाखल असताना तिच्या घराशेजारी राहणारी मिना राजु चौधरी ही महिला तिला भेटायला वारंवार यायची. दोन दिवसांनी त्या मातेची रुग्णालयातुन दिला सुटी झाल्याने शेजारीच राहणाऱ्या मिना राजु चौधरी हिने पीडितेला स्वतःबरोबर नेले.

मात्र त्यांना थेट घरी न नेता सरळ मिना चौधरी हिने त्यांना लोहारा येथिल लोटस या होटल मध्ये नेले व पीडितेला एच. आय. व्हि. असुन जर बाळाला जवळ ठेवले तर बाळाला सुध्दा एच.आय. व्हि होवु शकतो असे सांगुन बाळाला सुरक्षित ठेवायचे असल्यास नागपुर येथिल आपल्या ओळखीच्या एन.जी.ओ. कडे काही काळसांभाळायला देण्यास सांगितले. एड्स च्या भीतीने पीडित मातेने आपले बाळ नागपुर येथुन आलेल्या ३ महिलांच्या स्वाधिन केले. 

दि.१८/०१/२०२२ रोजी मिना राजु चौधरी हि पिडीत हिच्या घरी जावुन तिला बाळ सांभाळण्याचे म्हणुन ४९,०००/- रू दिले. मात्र आपले बाळ सांभाळण्याचे आपल्यालाच पैसे कसे मिळतील अशी शंका आल्याने तिने बाळाला भेटायचे आहे असा तगादा लावला मात्र मिना चौधरी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने आपल्या बाळाला विकण्यात आल्याची शंका आल्याने  पीडितेने अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संपुर्ण घटना समजुण घेतली त्यावरूण पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध  क्रमांक  53 / 2022 कलम 370, 417, 420, 34 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेचे गार्भिय खुप जास्त असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे ह्यांनी पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे यांना पथकासह पुढील कार्यवाही करण्याकामी रवाना केले. घटनेची माहीती घेतली असता यातील प्रमुख आरोपी नामे मिना राजु चौधरी हिला ताब्यात घेण्यात आले व तिला विचारपुस केली असता तिने तिचा प्रियकर नामे जाबिर रफिक शेख वय ३२ रा. बल्लारपूर, अंजुम  सलीम सय्यद वय ४३ रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर यांचे मदतिने नागपुर येथिल वनिता कावडे, पुजा शाहु, शालीनी गोपाल मोडक सर्व रा. नागपुर यांना सदर नवजात बाळ २,७५,०००/-रू किमतीला विकल्याचे कबुल केले. त्यावरूण तात्काळ कोणताही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप कापडे यांचे सह एक पथक नागपुर करीता रवाना करण्यात आले. त्यांनी आपले गोपनिय माहीती व तपास कौशल्य वापरून वरील नमुद तिन्ही महीलांबद्दल माहीती घेतली असता दोन महीला रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणुन काम करीत असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यावरून त्यांना नागपुर येथुन ताब्यात घेतले व १० दिवसाचे बाळा बाबत विचारणा केली असता त्यांनी सदर बाळ हे चंद्रपुर येथे दिल्याचे धक्कादायक माहीती प्राप्त झाली. त्यावरून नागपुर येथिल महीला नामे दनिता मुलचंद कावडे, पुजा सुरेद्र शाहू, शालीनी गोपाल मोडक यांना ताब्यात घेतले व तात्काळ चंद्रपुर येथे आणुन प्राप्त माहितीनुसार स्मिता मानकर ह्या महीलेकडे सांभाळायला ठेवलेल्या बाळाला ताब्यात घेतले. नवजात बालकास ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी करीता त्यास जिल्हा साम्याण रुग्णालय चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले असुन सदर प्रकणात एकुण ६ आरोपी नामे १) मिना राजु चौधरी वय ३४ रा.शाम नगर चंद्रपुर,  २) जाबिर रफिक शेख वय ३२ रा. बल्लारपूर, 3) अंजुम सलीम सय्यद वय ४३ रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर, ४) वनिता मुलचंद कावडे वय ३९ ,५) पुजा सुरेद्र शाहु वय २९ धंदा स्टॉफ नर्स, ६) शालीनी गोपाल मोडक वय ४८ धंदा स्टॉफ नर्स तिन्ही रा. नागपुर यांना अटक करण्यात आली असुन पुठिल तपास रामनगर पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सपोनि जितेद्र बोबडे, पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, संजय आतकुलवार, अमोल धंदरे, संतोष येलपुरवार, कुंदनसिंग बावरी, रविंद्र पंधरे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्राजल झिलपे, महीला पोलीस अपर्णा मानकर, निराशा तितरे यांचे पथकाने केली.


Post a Comment

0 Comments