बल्लारपूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 



बल्लारपूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा  

◾मुख्य शासकीय कार्यक्रम उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे पार पडला

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय गणराज्याचा ७३ वा वर्धापन दिन बल्लारपूर शहरात उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी ९:१५ वाजता उपविभागीय कार्यालय येथे मा.दीप्ती धनंजय सूर्यवंशी-पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय आईचंवार, तहसीलदार बल्लारपूर, विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर, तेलंग साहेब, साळवे साहेब, नायब तहसीलदार बल्लारपूर, मा.चंदनसिह चंदेल, माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, मा.हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, घनश्याम मूलचंदानी ज्येष्ठ काँग्रेस नेते, भास्कर माकोडे, निशांत आत्राम, राजू झोडे, संपत कोरडे, देवेंद्र आर्य, विकास दुपारे यांच्यासह प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

         नगर परिषदेच्या प्रांगणात सकाळी १०:०५ मिनीटांनी नगर परिषदेचे प्रशासक म्हणून विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांच्याहस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी बल्लारपूर शहराच्या ऐतिहासिक वैभव असलेले गोंड राजाचे वंशज राजे वीरशहा महाराज उपस्थित होते तसेच हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, मा.चंदनसिह चंदेल, विविध राजकीय पक्षाचे नेते, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर ऐतिहासिक किल्ल्यावर सकाळी १०:२५ मिनीटांनी मा.विजय सरनाईक मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांच्याहस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

     बल्लारपूर शहरातील अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयातही ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले या अंतर्गत बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, पंचायत समिती बल्लारपूर, अग्निशमन कार्यालय बल्लारपूर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मा.चंदनसिह चंदेल यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी पदाधिकारी यांची उपस्थिती होती, बल्लारपूर शहरातील गांधी चौक परिसरात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष अब्दुल करीम यांच्या हस्ते पार पडले, व्यापारी अशोसन वस्ती विभाग वतीने श्री.नरेंद्र तिलोकानी, व्यापारी मंडळाच्या बल्लारपूर बिजनेस अशोसन डेपो विभाग वतीने श्री. नरहरी ताऊटवार  यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, गुरुनानक विज्ञान महाविद्यालय, कला-वाणिज्य महाविद्यालय, माउंट विज्ञान महाविद्यालय, यांच्यासह बल्लारपूर शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयात ध्वजारोहण पार पडले.

       बल्लारपूर शहरातील जयभीम चौक परिसरात भिमा-कोरेगाव विजय स्तभ परिसरात सकाळी ८:३० वाजता बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तर अवित्तम बौध्द मंडळ व सावित्रीबाई फुले वाचनालय च्या संयुक्त माध्यमातून ७३ व्या प्रजासत्ताक दिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सर्वसामान्य नागरिकांची अडचण लक्षात घेऊन मोफत श्रमिक कार्ड अभियान राबविण्यात आले असून सदर अभियान ३ दिवस राबविण्यात येणार आहे तरी नागरिकांनी प्रा.राजेश ब्राम्हणे, अविनाश शेंडे, मिथुन निमसटकर, गौतम रामटेके, नितेश गायकवाड ई शी सम्पर्क साधावा असे आवाहन करण्यात आले विशेष बाब म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त बल्लारपूर शहरातील अनेक राष्ट्रीय स्मारक व महापुरुषांच्या स्मारक परिसरात विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाले आहेत.



Post a Comment

0 Comments