ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघातात २ ठार : अनेक जखमी असल्याचे वृत्त

 


ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघातात २ ठार : अनेक जखमी असल्याचे वृत्त

◾नागपूर वरून चंद्रपूरला येत असलेल्या रामायण ट्रॅव्हल्स

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : नागपूर वरून चंद्रपूरला येत असलेल्या रामायण ट्रॅव्हल्सने वरोरा जवळ रस्ता दुभाजक तोडून ट्रकला धडक दिली या भीषण अपघातात २ व्यक्ती ठार झाल्याचे वृत्त आहे तर या अपघातात अनेक व्यक्ती जखमी असल्याचे वृत्त आहे. सदर अपघात ट्रॅव्हल्स चालकाचे त्यांच्या वाहणावरून नियंत्रण सुटल्यामूळ झाला असून या अपघातात ट्रॅव्हल्स च्या कॅबिन मध्ये काही प्रवासी अडकले असून ट्रॅव्हल्सचे कॅबिन तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत या अपघातातील जखमींना वरोरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे तसेच या अपघातात जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments