अपघातग्रस्तांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

 



अपघातग्रस्तांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : वरोरा येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नागपुर येथील बैठकीत माहिती मिळताच त्यांनी तातडीने बैठक आटोपती घेतली. लगेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करून, अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. अपघातग्रस्तांसाठी त्वरीत रुग्णवाहिका पाठवून ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय येथे क्षणाचाही विलंब न करता उपचार करावे. अपघातानंतरचा एक तास अतिशय महत्वाचा असतो. जास्तीत जास्त रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही त्यांनी म्हटले. सर्व परिस्थितीवर पालकमंत्री लक्ष ठेवून आहेत.


Post a Comment

0 Comments