चंद्रपूर जिल्ह्यातील ६ नगरपंचायत निवडणुकीत ४ ठिकाणी महाविकास आघाडी तर पोंभूर्ण भाजपा ची सत्ता व जिवती मध्ये त्रिशंकू स्थिती

 



चंद्रपूर जिल्ह्यातील ६ नगरपंचायत निवडणुकीत ४ ठिकाणी महाविकास आघाडी तर पोंभूर्ण भाजपा ची सत्ता व जिवती मध्ये त्रिशंकू स्थिती 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : नुकत्याच दोन टप्प्यात पार पडलेल्या व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संदिग्ध स्थितीत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, सिंदेवाही, सावली, कोरपना, गोंडपीपरी, पोंभूर्ण बहुचर्चित नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असुन जिल्ह्यातील ६ पैकी ४ नगर पंचायतींवर काँग्रेस पक्षाने निर्विवाद कब्जा केला असुन पोंभूर्णा ह्या एकमेव नगर पंचायतीवर भाजपने झेंडा रोवला आहे तर दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती नगर पंचायतीमधे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. आज मतमोजणी नंतर घोषित झालेल्या निकालाचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील ४ नगर पंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात गेल्या आहे. जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही, कोरपना व गोंडपिपरी येथे पक्षाने निर्विवाद यश संपादन केले असुन जिवती येथे काँग्रेस व राष्ट्रवादीने समसमान ६ तर गोंडवाना गणतंत्र पार्टीने ५ जागी विजय संपादन करून आपली उपस्थिती जोरकसपणे दर्शविली आहे.



Post a Comment

0 Comments