बल्लारपूर वरून चंद्रपूर ला जात असताना वाहणावरील नियंत्रण सुटल्यामुळे शेतात जावून पलटला

 




बल्लारपूर वरून चंद्रपूर ला जात असताना वाहणावरील नियंत्रण सुटल्यामुळे  शेतात जावून पलटला 

◾टोल वाचविणे पडले महाग, अरुंद रस्त्याअभावी पलटला शेतात 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर-बल्लारपूर राज्य महामार्ग असल्याने टोल वाचविण्यासाठी जड वाहन बल्लारपूर किंवा नांदगाव मार्ग विसापूर ला जात असतात बल्लारपूर-नांदगाव रोड जडवाहतुकी साठी नसून सुध्दा टोल विरहित असतांना या मार्गाने अनेक जड वाहने जात असतात दरम्यान १५ जानेवारीच्या रात्री १:३० वाजताच्या सुमारास सिमेंटने भरलेल्या ट्रक क्र. MH 34 AB 3947 बल्लारपूर वरून चंद्रपूर ला जात असताना वाहणावरील नियंत्रण सुटल्यामुळे नत्थु टोंगे यांच्या शेतात जावून पलटला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीने नाली बांधकामाची माती रस्त्यावर टाकून ठेवल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यातून वाहन चालविताना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळेच सदर अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निव्वळ टोल वाचविण्यासाठी जड वाहन चालक या पर्यायी मार्गाचा वापर करीत असतात त्यामुळं भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं संबंधित ग्राम पंचायतीने रस्त्यावरील मातीचे ढिगारे त्वरित उचलावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments