भीषण अपघात : चारचाकी वाहन पलटी झाल्यामुळे एक महिला घटनास्थळीच मृत्यू तर ११ जखमी



भीषण अपघात : चारचाकी वाहन पलटी झाल्यामुळे एक महिला घटनास्थळीच मृत्यू तर ११ जखमी 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )  : ओरिसावरून तेलंगाना जिल्हा करीम नगर येथे कामासाठी जात असलेल्या चारचाकी वाहनाचा गाडी क्र. OD 03 M 3197 मूल वरून गडचिरोली च्या मुख्य मार्गावरून जात असतांना आकापूर वळणावर चारचाकी वाहन पलटी झाल्यामुळे एक महिला घटनास्थळीच मृत्यू झाला असून यातील ११ प्रवासी जखमी असून त्यांचेवर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर अपघात मंगळवार पहाटेच्या सुमारास घडला असून सद्यस्थितीत चंद्रपूर-गडचिरोली मार्गाचे काम सुरू असून जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रिप्लेकटर लावण्यात आले नसल्यामुळे व वाहन चालक या मार्गावर नवीन असल्यामुळे सदर अपघात घडल्याचं वृत्त आहे. अपघात घडताच मूल पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले व जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भातील पुढील उपचार मूल पोलीस करीत आहे.



Post a Comment

0 Comments