बल्लारपूर पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्र च्या ATM मध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीस तर दुसऱ्या घटनेत ३ लाख ९५ हजार रुपये चोरी केली असल्याची घटना

 


बल्लारपूर पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्र च्या ATM मध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीस तर दुसऱ्या घटनेत  ३ लाख ९५ हजार रुपये चोरी केली असल्याची घटना  

◾चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एक - एक आरोपीस अटक तर २ आरोपी फरार

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील मुख्य महामार्गावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या ATM  मध्ये १८ जानेवारीच्या पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान २ अज्ञात व्यक्तींनी चोरी करण्याच्या प्रयत्न करीत असतांना बल्लारपूर पोलिसांनी वेळीच दखल घेतल्यामुळे त्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही च्या आधारावर बामणी येथून दीपक उर्फ अजय राजपूत ( वय-१९ ) किल्ला वॉर्ड,बल्लारपूर  निवासी असलेल्या एका व्यक्तीला अटक केली तर या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस तपास करीत आहे विशेष म्हणजे या घटनेचे सिग्नल बँकेचे मुख्यालय असलेल्यानोएडा ( दिल्ली ) स्थित बँकेला माहीत झाल्यावर याची माहिती संबंधित पोलीस मुख्यालयाला लगेच माहिती कळते व या आधारावर बल्लारपूर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली पुढील तपास बल्लारपूर पोलीस चे सपोनि रमीज मुलानी करीत आहे.

          तर दुसऱ्या एका घटनेत बल्लारपूर शहरातील ( FDCM ) गौरक्षण वार्ड,बल्लारपूर  परिसरात राहणारे रविंद्र कुमार रामछबिला प्रसाद ( वय५३ ) हे १९ जानेवारीला आपल्या घराला सकाळी १० ते दुपारी ३ वाजताच्या दरम्यान कुलूपबंद करून बाहेर गेले असता २ अज्ञात चोरांनी बनावट चाबी द्वारे घराचे कुलूप खोलून त्यांच्या कपाटातील ३ लाख ९५ हजार रुपये चोरी केली असल्याची घटना उघडकीस येताच या प्रकरणाची तक्रार बल्लारपूर पोलिसात दाखल झाली असता संशयाच्या आधारे एक आरोपी नामे संतोष संजू दुर्गे ( वय२९ ) रा. गडचांदूर यांना विचारपूस केली असता गुन्हा कबूल केला व त्यांचे कडून १८ हजार ९०० रु हस्तगत करण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली शैलेंद्र ठाकरे करीत आहे विशेष म्हणजे या दोन्ही प्रकरणात एक-एक आरोपीस अटक केली आहे तर २ आरोपी पसार झाले आहेत पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.


Post a Comment

0 Comments