अतिदुर्लभ रक्ताचा विमानप्रवास कार्गो विमानाने बंगलोर वरून नागपूरला आणले रक्त : अतिदुर्लभ रक्तगट असलेल्या A2B रक्तगटाच्या २ व्यक्तींनी केले रक्तदान

 



अतिदुर्लभ रक्ताचा विमानप्रवास कार्गो विमानाने बंगलोर वरून नागपूरला आणले रक्त : अतिदुर्लभ रक्तगट असलेल्या A2B रक्तगटाच्या २ व्यक्तींनी केले रक्तदान 

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधे उपचारासाठी दाखल झालेल्या उज्जेर सिंह सऊद ह्यांना रक्ताची आवश्यकता होती मात्र त्यांचा रक्तगट अतीदुर्लभ अशा A2B निगेटिव्ह ह्या गटाचे असल्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या रक्ताची उपलब्धता होत नव्हती. कारण हा रक्तगट अतिदूर्लभ समजल्या जात असून लाखो व्यक्तींपैकी एखाद्याचा हा रक्तगट असतो. अशा परिस्थितीमुळे अत्यंत अडचणीत असलेल्या रुग्णाला अत्यावश्यक असलेले रक्त मिळणे दुरापास्त झाले होते मात्र चंद्रपूर येथील रक्त संयोजक रिंकु कुमरे व रुग्णाचे नातेवाईक सरस्वती सऊद ह्यांनी अत्यंत प्रयत्न करून अमित जैन ह्यांच्याशी संपर्क करून त्यांना A2B निगेटिव्ह रक्ताची तातडीने आवश्यकता असल्याचे कळविले. अमित जैन ह्यांनी आपल्या संपर्काचा अत्यंत कुशलतेने वापर करून बंगळुरू येथिल शंकर नारायण और मधु कालीराजन ह्यांच्याशी संपर्क साधला व त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. अमित जैन ह्यांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत दोघांनीही बंगळुरू येथिल लॉयंस रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. ह्या सर्व घडामोडींना 3-4 दिवस लागले मात्र त्यानंतर प्राप्त झालेले दुर्मिळ रक्त अखेर कार्गो विमानाने बंगळुरू येथुन नागपुरला पोहचविण्यात आले. ह्यासाठी लॉयन्स ब्लड बँकेच्या सूरज ह्यांनीही अत्यंत महत्वाची भुमकापार पाडली असुन रुग्णाच्या आप्तांनी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments