राज्य पत्रकार संघाची दिनदर्शिका 2022 चे आ. प्रकाश गजभिये यांचे हस्ते थाटात प्रकाशन


 



राज्य पत्रकार संघाची दिनदर्शिका 2022 चे आ. प्रकाश  गजभिये यांचे हस्ते थाटात प्रकाशन

◾पत्रकारांमुळेच समस्या प्रशाशना समोर येतात - अजय पाटील

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : पत्रकार समाजाचा आरसा असून अनेक सामाजिक समस्या पत्रकारांमुळेच शाशना पुढे येतात हा इतिहास असल्याची ग्वाही महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणे चे अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे दिनदर्शिका 2022  चे प्रकाशन सोहळयात ते बोलत होते.बाबुराव धनवटे सभागृहात संपन्न झालेल्या या दिनदशिंका प़काशन सोहळयाचे अध्यक्षस्थानी आमदार प़काश गजभिये तर विशेष अतिथी म्हणून राज्य संघाचे विदर्भ अध्यक्ष महेश पानसे,समाजसेवक रॉकेश कुमार जेफ,उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी,संपादक नरेंद्र परिहार उपस्थित होते.

 महाराष्ट्र  राज्य पत्रकार संघाचे पुवं विदर्भ विभागातर्फे दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन सोहळ्याचे आयोजनासोबत

जेष्ट हिंदी कवी व शायर ईमरान फैज व जमिल अन्सारी यांचे मुशायरा कार्यक्रमाचे  आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले होते.

 प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थानावरून बोलतांना समाजातील सर्व  घटकांनी वृत्तपत्रांचे दुरगामी भविष्याकरीता पुढाकार घेऊन सहकार्याची भावना जोपासण्याचे आवाहन आमदार प्रकाश गजभिये यांनी केले.मा.उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी व जेष्ट समाजसेवक रॉकेश कुमार जैफ यांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळण्याकरीता पत्रकारांनी आपली लेखनी सदैव तयार ठेवावी अशी सुचना केली.

                प्रकाशन सोहळयातळ्याचे प्रास्ताविक राज्य पत्रकार संघाचे विदर्भ संघटक आनंद शर्मा यांनी केले तर समारंभाचे सुंदर संचालन मोहम्मद सलिम यांनी केले. यावेळी संघाचे विदर्भ सरचिटणीस शरद नागदेवे, नागपूर शहर जिल्हाध्यक्ष विक्की शेंडें, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष ईरफान खान, नागपूर ग्रामिण जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाने व परिसरातील पत्रकार व शुभचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments