बल्लारपूरात दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानातून 1,53 ,965 रु चोरी : चोर पसार

 



बल्लारपूरात दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानातून 1,53 ,965 रु चोरी : चोर पसार

◾10 ग्राम चेन व एक  नेकलेस 19  ग्राम

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील जुने बसस्थानक परिसरात असलेल्या खंडेलवार ज्वेलर्स बल्लारपूर  यांच्या दुकानातून आज दुपारी जवळपास १:३० वाजताच्या दरम्यान १ लाख ५४ हजार रु ची चोरी झाल्याची घटना घडली या घटनेत ( १०ग्राम चेन व १ नेकलेस १९ ग्राम ) या दोन्हीही किंमत १,५३, ९६५/- रु किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असून या चोरीचा संशयित हा इसम एका पांढऱ्या रंगाच्या कार मधून आला आहे.

 सदर कार क्र. MH 34 BR 5074 या कार मधून २ व्यक्ती असून १ व्यक्ती कार मध्येच बसून होता तर १ व्यक्ती कार मधून उतरून समान खरेदी करण्यासाठी दुकानात आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे तसेच त्या व्यक्तीने राजेश कुमार पाटील या नावाने सामानाची खरेदी केली ( १० ग्राम ची १ चैन, १९ ग्राम चा १ नेकलेस ) ई वस्तूची खरेदी केली यानंतर सदर व्यक्तीने १२ ग्रामच्या कपलब्रॅण्ड या रिंगचे ऑर्डर दिले व या ची अडव्हास म्हणून ३१,००० रु पाठवतो असे म्हणून सांगितले मात्र या सर्व वस्तूची किंमत ऑनलाईन स्वरूपात करण्यात आली मात्र सदर रक्कम संबंधित ज्वेलर्स च्या खात्यात जमा झाली नसल्याचे सांगितले या माहितीवरून सदर दुकानदार श्री. गौरव खंडेलवाल स्थानिक बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतले असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमीझ  मुलांनी करीत आहे.


Post a Comment

1 Comments

  1. दुकान मालक का नाम नही लिखे ओर जो काम करते उसका नाम नही डाले ।
    खंडेलवार नही खंडेलवाल है ।

    ReplyDelete