गोंडपीपरी नगरपंचायत निवडणुकीत असाही उमेदवार ज्याला 0 मत मिळालं

 



गोंडपीपरी नगरपंचायत निवडणुकीत असाही उमेदवार ज्याला 0 मत मिळालं  

◾स्वतः च मत ही त्याला मिळालं नाही

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )  : निवडणूक म्हंटली की अनेक रंजक गोष्टी उघडकीस येतात विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी नगरपंचायत निवडणूक अनेक घडामोडी नी गाजली आहे दोन सख्या जावामध्ये काट्याची लढत झाली या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले या निकालात एका उमेदवाराला चक्क 0 मत मिळाली विशेष म्हणजे या उमेदवाराला स्वतः चे ही मत मिळालं नाही एका प्रतिष्ठित राजकीय पक्षाचे उमेदवार असलेल्या या उमेदवाराने बंडखोरी केली मात्र वरिष्ठांनी समजूत काढल्यामुळं उमेदवाराने स्वतःचा प्रचार केला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात नुकत्याच सहा नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या गोंडपीपरी तालुक्यात दोन सख्या जावामध्ये काट्याची लढत झाली तर कार्यकर्त्यांना मटणाची मेजवानी देणाऱ्या उमेदवाराची सात किलो मटण चोरीला गेली असल्याची घटना उघडकीस आली अशा घटनांनी नागरिकांचेच चांगलेच मनोरंजन केले आता निकाल जाहीर झाले आहे गोडपीपरी च्या वार्ड नंबर २ मधील एससी प्रवर्गातील उमेदवार असलेले जितेंद्र ईटेकर यांनी पक्षा विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविण्याचा विचार केला व उमेदवारी जाहीर केले मात्र वरिष्ठांनी व पक्षश्रेष्ठीनी समजूत काढल्यामुळं त्याने स्वतःचा प्रचार केला नाही व स्वतःचे मत ही स्वतःला दिले नाही मात्र शून्य मत मिळणारे जितेंद्र ईटेकर हे या निवडणुकीत जिल्ह्यातील पहिले उमेदवार ठरले आहेत.



Post a Comment

0 Comments