दुर्दैवी अपघातात घटनास्थळीच मृत्यू चंद्रपूरच्या बायपास मार्गावर


दुर्दैवी अपघातात घटनास्थळीच मृत्यू  चंद्रपूरच्या बायपास मार्गावर

 ◾बायपास मार्गावर हायवाच्या धडकेत एकाचा मृत्यू : DRC  परिसरातील घटना 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीचा मार्ग म्हणजे चंद्रपूर-बल्लारपूर मार्ग म्हणून ओळखला जातो व याच मार्गावरील बायपास रोडच्या DRC परिसरातील घटना  आज सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान राजकुमार सोनकर या युवकाला शेरोवाली कोळसा कम्पनीच्या हायवा ट्रक ने जोरदार धडक दिली या दुर्दैवी अपघातात राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला या प्रकरणात रामनगर पोलिसांनी आरोपी वाहनचालकाला अटक केली.  मृतक राजकुमार सोनकर वय-३८ वर्ष हा वाहन चालकाचे काम करीत असून आज सकाळी तो आपल्या दुचाकी क्रमांक MH-34 BL-0704 ने जात असतांना हायवा ट्रक क्रमांक MH-34 BG 0852 या वाहनाने राजकुमारच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत राजकुमारचा घटनास्थळी मृत्यू झाला राजकुमार हा अष्टभुजा वार्डातील रहिवासी असून तो कामाला जाण्यासाठी घरून निघाला मात्र अपघातामुळे मृत्यूच्या दारात जाऊन अळकला या प्रकरणात हायवा चालक नारायण मडावी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.


Post a Comment

0 Comments